पहिल्या डोसचे प्रमाणपत्र नसल्यास दुसऱ्या डोसला येणार अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:37+5:302021-06-30T04:09:37+5:30

(असाईनमेंट) अमरावती : पुरवठ्यात सातत्य नसले तरी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. ग्रामीण भागात मात्र काही तांत्रिक ...

If the first dose is not certified, the second dose will have problems | पहिल्या डोसचे प्रमाणपत्र नसल्यास दुसऱ्या डोसला येणार अडचणी

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र नसल्यास दुसऱ्या डोसला येणार अडचणी

Next

(असाईनमेंट)

अमरावती : पुरवठ्यात सातत्य नसले तरी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. ग्रामीण भागात मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांसह लसीकरण केंद्रांवरील अधिकाऱ्यांना त्रास होत आहेत. यासोबतच पहिला डोस घेतल्यानंतर प्रमाणपत्र नसल्यास दुसरा डोस कसा घ्यायचा, हा प्रश्न निर्माण होत आहे. याविषयी केंद्रावरील अधिकाऱ्यांची खात्री पटल्यानंतर त्या नागरिकांना दुसरा डोस घेता येत असल्याचे लसीकरण जिल्हा समन्वयकांनी सांगितले.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या दोन टप्प्यात हेल्थ लाईन वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षावरील सहव्याधी असणारे नागरिक व १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्याचा ग्रामीण भागाचा फारसा संबंध नसला तरी नंतर मात्र ग्रामीण भागातही लसीकरण सुरू झालेले आहे.

ग्रामीण भागात लसीकरणाचा पहिला डोस घेताना मोबाईल नंबरचा अडचणी निर्माण झाल्या. काहींनी शेजाऱ्यांचे नंतर दिले, तर काही व्यक्तींनी दिलेले नंबर दुसऱ्याच व्यक्तींचे निघाल्याने त्यांना मेसेज गेल्याचेही प्रकार घडले आहेत. या सर्व अडचणी दुसरा डोज घेतेवेळी त्या नागरिकांसह केंद्रावर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही निदर्शनात आल्या असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

पाई्रंटर

आतापर्यंत झालेले लसीकरण : ६,०२,९७१

पहिला डोस : ४,५२,७९१

दुसरा डोस : १,५०,१८०

बाॅक्स

लसीकरणाचे वेळी ही घ्या काळजी

* लसीकरणाचे वेळी शक्यतोवर स्वत:चाच नंबर द्यावा. दुसऱ्यांचा नंबर दिल्यास व तो व्यक्ती जागेवर नसल्यास दुसऱ्या डोसच्या वेळी अडचणी निर्माण होतात.

* स्वत:कडे मोबाईल नसल्यास अगदी जवळच्या नातेवाइकाचा नंबर द्यावा, जेणेकरून दुसऱ्या डोसच्या वेळी ते सहज उपलब्ध होतील किंवा प्रमाणपत्र मिळेल.

* लसीकरणानंतर लगेच प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी, जेणेकरून दुसरा डोज घेतेवेळी सहज व सोपे होऊन अडचणी येणार नाहीत.

बॉक्स

पहिल्या डोजचे प्रमाणपत्र न मिळाल्यास...

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा डोस घेतेवेळी त्याच केंद्रावर जावे, जेणेकरून कुठे ना कुठे नोंद असेल. याशिवाय पहिला डोस घेतल्याची संबंधित डॉक्टरांची खात्री पटल्यानंतरच दुसरा डोस घेता येणार आहे. पोर्टलवर तशी नोंद करता येत असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.

कोट

पहिला डोस घेतल्यावर प्रमाणपत्राची प्रिंट काढा

लसींचा पहिला डोस घेतल्यानंतर लगेच प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी, जेणेकरून दुसरा डोस घेताना कुठलीही अडचण येणार नाही. जर प्रमाणपत्र नसेल, तर संबंधित डॉक्टरांची खात्री पटल्यानंतर दुसरा डोस घेता येईल.

- विनोद करंजीकर, जिल्हा समन्वयक, लसीकरण मोहीम

-------------------------

मोबाईल नंबर कोणाचा हेच आठवत नाही

लसीकरणाचे गर्दी खूप होती. चार तास रांगेत राहिल्यामुळे कोणता नंबर दिला, हे आता आठवत नाही. एकदा केंद्रावरून परत आले. त्यामुळे अजूनपर्यंत दुसरा डोस घेतला नाही.

- सुलोचना पाटील, अर्जुननगर

------------

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे पहिली लस घेतली. त्यावेळी मुलीचा क्रमांक नोंदणीसाठी दिला होता. मात्र, आता चुकीचा क्रमांक नोंदविला गेला, याची कल्पना दिल्यानंतर केंद्रावर दुसरा डोस मिळाला.

- सुनीता खंडारे, रहाटगाव

Web Title: If the first dose is not certified, the second dose will have problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.