होर्डिंग लावाल तर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:21 PM2019-03-02T23:21:18+5:302019-03-02T23:21:42+5:30

महानगरात विनापरवानगी होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनर लावून ‘चमकोगिरी’ वाढली आहे. हे होर्डिंग अंगावर पडून नागरिक जखमी होऊ शकतात. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्याच्या अनुषंगाने २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व फ्लेक्स, प्रिंटिंग व्यावसायिकांची बैठक आयुक्तांनी घेतली.

If hoardings are charged then foreclosure | होर्डिंग लावाल तर फौजदारी

होर्डिंग लावाल तर फौजदारी

Next
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचा इशारा : पक्षप्रतिनिधी, मुद्रकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगरात विनापरवानगी होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनर लावून ‘चमकोगिरी’ वाढली आहे. हे होर्डिंग अंगावर पडून नागरिक जखमी होऊ शकतात. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्याच्या अनुषंगाने २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व फ्लेक्स, प्रिंटिंग व्यावसायिकांची बैठक आयुक्तांनी घेतली.
महानगरपालिका क्षेत्रात बाजार व परवाना विभागाची परवानगी घेऊनच फलक, बॅनर लावण्यात यावे तसेच उच्च न्यायालयात अनधिकृत जाहिरातींसंबंधी सुरू असलेल्या जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ बाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती बैठकीत देण्यात आली. शहरातील उड्डाणपुलाचे कठडे, सिग्नल, परकोट यावर जाहिरात लागणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सर्व प्रिंटिंग व्यावसायिकांनी व्यवसायाचा परवाना काढणे अनिवार्य असून, फलकावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव बंधनकारक असल्याबाबत सूचना देण्यात आल्या. अनधिकृत फलक आढळल्यास संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र मालमत्तेचे विरूपणास प्रतिबंध अधिनियम १०५५ अंतर्गत महानगरपालिकेच्या नोडल अधिकाऱ्यामार्फत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल, अशी ताकीदही व्यावसायिक व उपस्थित विविध राजकीय पदाधिकाऱ्यांना माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
इकडे बैठक, तिकडे फलक
महापालिकेत इशारा देणारी बैठक सुरू असताना शहरात आज अनेक ठिकाणी होर्डिंग्स लागले. होर्डिंग निर्मूलन मोहिमेनंतरही फलक शहरात लागले. बैठकांमध्ये रमलेले आयुक्त कारवाई केव्हा करणार?

Web Title: If hoardings are charged then foreclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.