ते मजूर 'क्रिमिनल' तर नाहीत ना?

By admin | Published: November 20, 2015 01:03 AM2015-11-20T01:03:43+5:302015-11-20T01:03:43+5:30

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत बिहारहून आलेल्या शंभराहून अधिक मजुरांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे.

If the laborers are 'criminal' then they are not? | ते मजूर 'क्रिमिनल' तर नाहीत ना?

ते मजूर 'क्रिमिनल' तर नाहीत ना?

Next

पोलिसांची दिशाभूल? : शेतकऱ्यांच्या बाजार समितीचा सर्रास गैरवापर
अमरावती : शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत बिहारहून आलेल्या शंभराहून अधिक मजुरांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. मराठी भाषेचे पुसटसे देखील ज्ञान नसलेल्या आणि कुठलीही विश्वासार्हता नसलेल्या या मजुरांमध्ये त्या प्रांतातील तडीपार वा क्रिमिनल्सचाही समावेश असू शकतो, अशी भीती मराठी मजुरांनी व्यक्त केली आहे.
अमरावती बाजार समितीत सुमारे दीडशे बिहारी मजूर कार्यरत आहेत. या मजुरांचा अमरावती जिल्ह्याशी काडीचा संबंध नाही. अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्रातही ते नवीन आहेत. या मजुरांच्या पूर्वईतिहासाबद्दल कोणतीच माहिती नसताना बाजार समितीच्या आवारात त्यांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. या मजुरांना आणणाऱ्या व्यापाऱ्यांच्या कार्यालयात वा गोदामातील जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी त्यांना स्टोव्ह, गॅस आदी साधनेही दिली आहेत.

Web Title: If the laborers are 'criminal' then they are not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.