असेल पर्यावरण शिक्षक तरच मिळणार अनुदान
By admin | Published: May 29, 2014 11:32 PM2014-05-29T23:32:01+5:302014-05-29T23:32:01+5:30
विद्यापीठ स्तरावरील ज्या महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिक्षक नसतील त्यांना येथून पुढे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत भविष्यातील मिळणारे अनुदान देण्यात येणार नाही त्यामुळे ज्या महाविद्यालयांमध्ये
जितेंद्र दखने - अमरावती
विद्यापीठ स्तरावरील ज्या महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिक्षक नसतील त्यांना येथून पुढे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत भविष्यातील मिळणारे अनुदान देण्यात येणार नाही त्यामुळे ज्या महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिक्षक नाहीत त्यांच्यासमोर आता मोठा पेचप्रसंग उभा राहीला आहे.
ग्लोबलायजेशनच्या समस्या लक्षात घेता शाळा पातळीपासून पर्यावरणाचे शिक्षण देण्यासाठी तसेच त्याबाबतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी स्वतंत्र शिक्षण असण्याबाबत शासनाचा आदेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (युसीजी) पदवीस्तरावर असणार्या सर्व विद्याशाखांमधील पर्यावरण अभ्यासक्रमासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतही हाच आदेश देण्यात आला आहे. पर्यावरण अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र शिक्षक नसेल तर आगामी काळात युजीसीकडून मिळणार्या अनुदानाला पात्र महाविद्यालये राहणार नसतील असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये विद्यापीठातील अभ्यास मंडळामार्फत २00४-0६ पासून पर्यावरण अभ्यासक्रम सर्व महाविद्यालयांत सर्व विद्यार्थ्यांंमध्ये सुरू करण्यात आला आहे.सचिव जे.एस. संघु यांनी २ मे २0१४ रोजी विद्यापीठाला सूचना प्राप्त झाल्या. विद्यापीठ आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पर्यावरण अभ्यासासाठी महाविद्यालयांनी शिक्षकांची नियुक्ती करावी असे कळविले आहे.