रेशन दुकानदार धान्य देत नसल्यास दुसऱ्या दुकानाचा पर्याय खुला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:30 AM2020-12-11T04:30:32+5:302020-12-11T04:30:32+5:30
पोर्टेबिलिटीचा फायदा : १९ हजार ९८७ जणांनी घेतला लाभ अमरावती : रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याच्या अनेकदा तक्रारी असतात. ...
पोर्टेबिलिटीचा फायदा : १९ हजार ९८७ जणांनी घेतला लाभ
अमरावती : रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याच्या अनेकदा तक्रारी असतात. कार्डधारकाला आतापर्यंत दुसऱ्या दुकानाचा पर्याय नसल्याने त्याच दुकानदाराकडून मनमानी सहन करीत धान्य घ्यावे लागत असे. या प्रकाराला आता चाप बसला असून, ग्राहकाला रेशन दुकान बदलता येणे शक्य झाले आहे. प्रशासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय ग्राहकाला दिला असून, जिल्ह्यात १९ हजार ९८७ कार्डधारकांनी लाभ घेतला आहे.
प्राधान्य गट, अंत्योदय अन्न योजना व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्त भाव धान्य दुकानांमधूृन दरमहा धान्य वितरित करण्यात येते. संबंधित शिधापत्रिकाधारकांना नियोजित रास्त भाव धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण होत नसेल, तर ग्राहकांना दुसऱ्या दूकानाचा पर्याय उपलब्ध आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत प्राधान्य गट अंत्योदय अन्न योजनेंतर्गत व एपील शेतकरी ५ लाख ४८ हजार ८४८ लाभार्थींना दरमहा धान्याचा लाभ देण्यात येत आहे.
बॉक्स
अशा आहेत तक्रारी
पोर्टेबिलिटी बायोमेट्रिक ओळख पटविताना नेटवर्कच्या मोठया अडचणी आहेत. त्यामुळे अनेकांना धान्य मिळत नाही. मालात हेराफेरी, धान्याचा दर्जा योग्य नसणे अशा तक्रारी सार्वत्रिक स्वरूपाच्या आहेत.
बॉक्स
कारवाईच सुरूच
काही रेशन दुकानांबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे, धान्याच्या हेराफेरी व अन्य कारणांसाठी प्राप्त झालेल्या तक्रारींवरून आतापर्यंत पुरवठा विभागाने २३ दुकानांचे परवाने रद्द करून २१ लाख ५० हजार ५४३.७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बॉक्स
५ लाख ४५ हजार ८४८
पोर्टेबिलिटीचा लाभ घेतलेले
१९ हजार ९८७
कोट
शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानासंदर्भात तक्रारी होत्या, यामध्ये धान्याची हेराफेरी व अन्य तक्रारीचा समावेश होता. या तक्रारींची चौकशी करून २३ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्या. याशिवाय दंडसुद्धा वसूल केला आहे. जवळचे दुकान किंवा इतर कारणांमुळे पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून दुसऱ्या दुकानामधून लाभ घेता येईल.
- अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी