बियाण्यांचा काळाबाजार केल्यास फौजदारी

By admin | Published: June 11, 2017 12:09 AM2017-06-11T00:09:37+5:302017-06-11T00:09:37+5:30

सर्वसामान्य शेतकऱ्यांना बनावट बियाणे दिल्यास अथवा बियाणे, खताचा काळाबाजार केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश तालुका भरारी पथकाने दिले आहेत.

If the seeds are black market then the criminal | बियाण्यांचा काळाबाजार केल्यास फौजदारी

बियाण्यांचा काळाबाजार केल्यास फौजदारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : सर्वसामान्य शेतकऱ्यांना बनावट बियाणे दिल्यास अथवा बियाणे, खताचा काळाबाजार केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश तालुका भरारी पथकाने दिले आहेत. यंदा कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला. विशेषत: यंदा कृषी केंद्रांची तपासणी करण्यासाठी महसूल विभागाची साथ मिळणार आहे़
तालुक्यात बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने भरारी पथकाची निर्मिती करण्यात येते़ तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांच्या नेतृत्वात तीन भरारी पथके नेमण्यात आली आहेत़ दुकानात स्टॉक बोर्ड, बियाणे व खताचा साठा, शेतकऱ्यांना देण्यात येणारी बिले, तसेच गोडावूनची तपासणी करण्यात येणार आहे़ रासायनिक या खताऐवजी शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या संयुक्त घटकातील खताचा वापर केल्यास काळाबाजार होणार नाही़ यासाठी शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे़ मागील वर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा अधिक होता़ यंदा कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे़ कपाशी १८ हजार हेक्टरवरून २९ हजार हेक्टरपर्यंत पेरा होणार आहे़ बियाणे वा खताचा काळाबाजार झाल्यास जीवनाश्यक वस्तू कायद्यान्वे कृषी केंद्र सेवा संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी दिली़ महसूल विभागाच्या वतीने तालुक्यात तहसीलदार सी़सी़ कोहरे यांच्या नेतृत्वात एक भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकात मंडल अधिकारी, तलाठी यांची नेमणूक करून एखाद्या शेतकऱ्यांची तालुका प्रशासनाला तक्रार प्राप्त होताच त्याचे निवारण त्वरित करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात येणार आहे़ यासाठी कोहरे यांनी मंडल अधिकारी व तलाठ्यांना गाव पातळीवर निर्देश दिले आहेत़

फसवणूक टाळणे गरजेचे
बोगस बियाण्यांची विक्री करून प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. यामुळे शेतकऱ्यांची हानी होते. हे नुकसान टाळण्याकरिता आता भरारी पथक कार्य करणार असून बियाण्यांचा काळाबाजार केल्यास थेट फौेजदारी दाखल करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक देखील टळणार आहे.

Web Title: If the seeds are black market then the criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.