स्काय वॉकला गरज भासल्यास शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, मात्र अडथळे दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:31+5:302021-06-25T04:10:31+5:30
चिखलदरा : देशातील पहिल्या स्काय वाॅकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, आमची काही हरकत नाही. परंतु, रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्याचे ...
चिखलदरा : देशातील पहिल्या स्काय वाॅकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, आमची काही हरकत नाही. परंतु, रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्याचे पत्र खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना केली आहे.
अडीच वर्षांपासून रखडत चाललेल्या चिखलदरा येथील देशातील पहिल्या स्काय वॉकच्या कामासाठी जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून परवानगी व निधी संदर्भात मागणी केली आहे. चिखलदऱ्याला हजारो पर्यटक येथे दरवर्षी येतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. तत्कालीन सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्काय वॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. सिडकोकडून त्याची उभारणी केली जात असून, गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉइंट दरम्यान ४०७ मीटर लांबीच्या या स्काय वॉकच्या उभारणीवर ३८ कोटी रुपये खर्च येणार आहे. जून २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण त्याचे काम आज अर्धवट पडलेले आहे. या स्काय वॉकवर उभे राहून पर्यटकांना चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळता येईल. त्यावर असलेल्या काचेच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून ५०० फूट खोल दरीचेही दर्शन घडणार आहे.