फुटपाथवरून बाइक सवारी कराल तर दंडासह होईल गुन्हा दाखल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:31 IST2024-12-24T12:30:04+5:302024-12-24T12:31:26+5:30

Amravati : शहरात अतिक्रमितांनी फुटपाथ केले गिळंकृत

If you ride a bike on the sidewalk, you will be charged with a fine! | फुटपाथवरून बाइक सवारी कराल तर दंडासह होईल गुन्हा दाखल !

If you ride a bike on the sidewalk, you will be charged with a fine!

अमरावती : शहरात काही ठिकाणी फुटपाथवरून दुचाकी नेली जाते. तर बहुतांश ठिकाणी अतिक्रमितांनी फुटपाथ गिळंकृत केले आहेत. शहरातील बहुतांश रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंटीकरण झाले. मात्र, त्यावरही अतिक्रमितांनी दुतर्फा अतिक्रमण केले आहे. शहरात नावालाच फुटपाथ दृष्टीस पडतात. फुटपाथवरून दुचाकी नेली, तर दंड ठोठावला जातो.


सिग्नल जॅम झाला की, फुटपाथवरून दुचाकी राजकमल, इर्विन चौकात वा अन्य चौकात एखादवेळेस सिग्नल जॅम झाला की, दुचाकी फुटपाथवरून काढण्याचा, दामटण्याचा प्रयत्न केला जातो.


पावती मिळेल अन् गुन्हाही दाखल 
फुटपाथ चालण्यासाठी अस्तित्वात आहे, त्याठिकाणी देखील वाहने दामटू नका. अन्यथा चलान फाडले जाईल. 


फुटपाथवर चालणाऱ्यांना हॉर्न देतात 
वाहतुकीची शिस्त न पाळता अनेक बेदरकार वाहनचालक रस्त्याच्या कडेने दुचाकी दामटतात. फुटपाथवर चालण्याचा पहिला हक्क पादचाऱ्यांचा असताना, अनेक बाइकस्वार तेथे देखील हॉर्न वाजवितात.


चालणाऱ्यांचा फूटपाथवर हक्क; तरीही... 
फुटपाथवर चालणाऱ्यांचा पहिला हक्क आहे. मात्र शहरातील अनेक फुटपाथवर हातगाड्या लावल्या जातात. तर अनेक फुटपाथवर गॅरेज, दुचाकींची खरेदी विक्री केली जाते. मात्र मनपाकडून मर्यादित कारवाई केली जाते. 


११ महिन्यांत अनेकांवर कारवाया 
११ महिन्यांत फुटपाथवरून वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना मर्यादित कारवाई झाली असली, तरी एकंदरीतच भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या ९ हजारांहून अधिक चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे.


फुटपाथ पादचाऱ्यांसाठी 
"फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असतात. ते वाहन दामटण्यासाठी नाही. अशा वाहनचालकांवर निरंतरपणे दंडात्मक कारवाई केली जाते." 
- कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त.

Web Title: If you ride a bike on the sidewalk, you will be charged with a fine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.