प्रारब्धवाद घालवायचा असेल तर राष्टÑसंतांचे विचार अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:28 PM2018-10-26T22:28:06+5:302018-10-26T22:33:16+5:30

भारत देशात सर्वात जास्त धर्म, भाषा, संप्रदाय, पंथ आहेत. ग्रामीण भागातील जनता दैव व प्रारब्ध यामध्येच गुंतलेले आहे. यासाठी राष्टÑसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार ग्रामीण जनतेच्या मनामनात न्यावा लागेल त्यावेळेस त्यांच्यातील प्रारब्धवाद कमी होईल, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी येथे केले.

If you want to eliminate destiny, then consider the thoughts of the saints | प्रारब्धवाद घालवायचा असेल तर राष्टÑसंतांचे विचार अंगिकारा

प्रारब्धवाद घालवायचा असेल तर राष्टÑसंतांचे विचार अंगिकारा

Next
ठळक मुद्देवसंत पुरके : शनिवारी होणार महिला संमेलन; ‘क्रांतिनायक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज’चे नागपूरकर करतील सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : भारत देशात सर्वात जास्त धर्म, भाषा, संप्रदाय, पंथ आहेत. ग्रामीण भागातील जनता दैव व प्रारब्ध यामध्येच गुंतलेले आहे. यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार ग्रामीण जनतेच्या मनामनात न्यावा लागेल त्यावेळेस त्यांच्यातील प्रारब्धवाद कमी होईल, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी येथे केले.
वंदनीय राष्ट्रसंतांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या युवक महोत्सवात पुरके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकासाचे प्रणेते पोपटराव पवार तसेच व्यासपीठावर नाम फाऊंडेशनचे विदर्भप्रमुख हरीश इथापे, अविनाश काकडे, प्राचार्य सुधीर बोरखडे, सूर्यप्रकाश जयस्वाल, जि.प. सदस्य प्रकाश साबळे, किशोर चांगुले, उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, दिलीप कोहळे, घनश्याम पिकले, प्रशांत डहाणे, निरंजन गाठेकर, बाबूराव धोटे यांची उपस्थिती होती.
युवा पिढीने चिकित्सक विचार करून बुवाबाजी, अंधश्रद्धा या विरोधात जागरूक राहिले पाहिजे. जिथे माणूस दगडासमोर नतमस्तक झाला, तिथे त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला. दगडासमोर नव्हे, विचारांसमोर झुकले पाहिजे. युवकांनी प्रारब्धवादाऐवजी प्रयत्नवादाचा अंगीकार केला पाहिजे. नवभारतामध्ये विश्वासाची पोकळी निर्माण झाली आहे. मेंदूची मशात करण्याची गरज असून, त्यासाठी युवकांनी वाचन वाढविणे आवश्यक आहे, असे पुरके म्हणाले. यावेळी हरीश इथापे, प्रकाश महाराज वाघ यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दिलीप कोहळे यांनी केले. यापूर्वी अमरावती येथील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. धामणगाव रेल्वे येथील लंगर समितीचे अध्यक्ष गिरीश भुतडा यांचा सत्कार करण्यात आला. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.
चांदूर बाजारची वैष्णवी विधळे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अव्वल
श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत गो.सी. टोम्पे महाविद्यालयाच्या वैष्णवी विधळेला पाच हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळाले. द्वितीय बक्षीस चार हजार रुपये अकोलाच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्रतीक महल्लेने पटकावले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस अमरावतीच्या शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयाची प्रतीक्षा गुरुनुले, चतुर्थ बक्षीस बडनेराच्या मेघे अभियांत्रिकीची मेधावी जामकर आणि पाचवे बक्षीस तळेगावच्या पी. आर. पाटील शिक्षण महाविद्यालयाचा दर्शन सांबारे याला मिळाले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण शोभा मोहोड व के.व्ही. दळवी यांनी केले. सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सूर्यप्रकाश जयस्वाल, दिलीप वांगे, माया गंधे, प्राचार्य माणिक पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: If you want to eliminate destiny, then consider the thoughts of the saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.