अवैध दारू, गुटखा महिनाभरात हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:27+5:30

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा, खासगी बसेसचे शहरात झालेले अतिक्रमण, स्कूल बसेसचे नियमानुकूल नसणे, चहा-कॉफी शॉपच्या नावाखाली सर्वत्र पसरलेले ‘लव्ह स्पॉट’ या मुद्यांवर तत्काळ दखल घेऊन कायद्याला वाकुल्या दाखविणाºया बाबी रोखण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

Illegal alcohol, get rid of Gutkha within a month | अवैध दारू, गुटखा महिनाभरात हद्दपार करा

अवैध दारू, गुटखा महिनाभरात हद्दपार करा

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे पोलीस खात्याला आदेश : अनियंत्रित वाहतूक, महिला व बाल सुरक्षेच्या मुद्यांवर दर्शविली नापसंती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बंदी असतानाही जिल्ह्यात सर्रास मिळणारी अवैध दारू आणि गुटखा महिनाभरात हद्दपार करा, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशानाला दिले. येणाऱ्या बैठकीत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झालेली दिसायला हवी, असे संगण्यासही त्या विसरल्या नाहीत.
जिल्ह्यातील वाढलेल्या अवैध व्यवसायांवर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बेशिस्त आणि धोकादायक वाहतूक, महिला आणि बाल सुरक्षेला मिळत असलेले आव्हान, दामिनी पथकाची गस्त, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा, खासगी बसेसचे शहरात झालेले अतिक्रमण, स्कूल बसेसचे नियमानुकूल नसणे, चहा-कॉफी शॉपच्या नावाखाली सर्वत्र पसरलेले ‘लव्ह स्पॉट’ या मुद्यांवर तत्काळ दखल घेऊन कायद्याला वाकुल्या दाखविणाºया बाबी रोखण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. अंमलबजावणी कशी करणार, त्यासाठीच्या कल्पक उपाययोजना काय, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना विचारला. तथापि, कल्पक उपाययोजनांऐवजी अधिकाऱ्यांनी वारंवार कारणे सांगण्यावरच भर दिला.
बैठक अपेक्षित उंचीवर जात नसल्याचे बघून अखेरीस कारणे सांगू नका, मला सुधारणा हव्या आहेत, असे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे आणि खणखणीत आवाजात बजावले. अधिकारांचा पुरेपूर वापर करा; परंतु लोकांना नाहक त्रास होणार नाही याची दक्षता जरूर घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोमवारी सायंकाळपासूनच सुधारणेला सुरुवात करा. मला रिझल्ट हवा आहे. तुम्ही सुधारणा केल्या, तर लोक मला फोन करून सांगतीलच. येणाऱ्यां बैठकीत दिलेल्या आदेशाचे पालन झालेले दिसायलाच हवे, असे पालकमंत्र्यांनी निक्षूण संगितले.
महिलाविषयक गुन्ह्यांचा, तपासाचा आणि शिक्षा होण्याचा आलेख पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जाणून घेतला. कन्व्हिक्शन दर ५० वरून ५१ टक्क्यांवर गेल्याचे पोलिसांनी सांगितले; मात्र महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी त्यावर असमाधान व्यक्त केले. महिला सुरक्षेचा मुद्दावर त्यांनी पोलीस प्रशासनाला सजग राहण्याचे निर्देश दिले. स्कार्फ बांधून दुचाकीवरून फिरणाऱ्या मुलींची सरप्राइज तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार, महानगरपालिका आयुक्त संजय निपाणे, पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, डीसीपी यशवंत सोळंके, डीसीपी शशिकांत सातव, सहायक आयुक्त रणजित देसाई, बळीराम डाखोरे, सुहास भोसले, प्रभारी आरटीओ प्रशांत देशमुख यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकाºयांची उपस्थिती होती.

हॅलो, मी यशोमती ठाकूर बोलतेय !
पोलिसांनी नागरिकांसाठी इमरजन्सी सेवा म्हणून उपलब्ध केलेला टोल फ्री क्रमांक १०० लागत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याची पडताळणी करण्यासाठी खुद्द पालकमंत्र्यांनी १०० क्रमांकावर फोन केला. स्पिकर फोन सुरू केला. काही वेळ ‘हॅलो’, ‘हॅलो’ बोलल्यावर कॉल रिसिव्ह केला गेला. कोण बोलता, हे पलीकडून विचारण्यात आले. मी यशोमती ठाकूर बोलतेय. हा टेस्टिंग कॉल आहे, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री बोलत असल्याचे कळताच, पलीकडून आम्हाला खोटे फोन करून बरेच लोक त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांकडून करण्यात आली. या फोनने वातवरण हलकेफुलके झाले.

वीरेंद्र जगतापांकडून आरटीओ
पोलिसांची पोलखोल

माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे पितळ उघडे पाडले. कायदा व सुव्यवस्थेऐवजी रेतीच्या वाहतुकीतच पोलिसांना अधिक आवड असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. ग्रामीण भागात विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर चालतात. ते रेती तस्करी, गोवंश वाहतूक करतात. वाहतूक पोलीस, महसूल आणि आरटीओ यांच्या संगनमतानेच हे अवैध प्रकार सुरू आहेत. शेतकºयांच्या अवजारांची चोरी वाढली आहे. चोरीला गेलेले रोटाव्हेटर कुठे आहे, हे मी स्वत: एसपींना फोन करून सांगितले. शेतकºयाला ते परत नेण्यास सांगण्यात आले. दुसºया दिवशी पोलिसांनी रोटाव्हेटर पकडल्याचे वृत्त माध्यमांमधून छापून आणले. काम न करता श्रेय घेण्याच्या या पोलिसी वृत्तीवर जगताप यांनी नाराजी व्यक्त केली.

- तर मंत्रालयाच्या गेटवरच गावठी दारू विकू : आ. देवेंद्र भुयार
बैठकीत आ. देवेंद्र भुयार यांनी अवैध रेती वाहतुकीचा आणि मोहाच्या गावठी दारूचा विषय तीव्रपणे मांडला. मध्य प्रदेशातून जिल्ह्यात गावठी दारू पोहोचते. याकडे पोलीस दुर्लक्ष करतात. एसडीपीओ समस्याही ऐकत नाहीत. त्यांना आमच्या अंगाची दुर्गंधी येता काय, काय सांगावे! आता मोहाच्या पावट्या तयार करून त्याच मंत्रालयाच्या गेटवर विकण्याचे आंदोलन करण्याची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपायुक्तांना म्हणाल्या, तुमचा चेहरा प्रश्नांकित!
आढावा बैठकीत नामदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती अधिकाºयांची ओळख परेड घेतली. अवैध दारू, गुटखा, वाहतूक या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना, त्यांचे सर्व अधिकाऱ्यांवर लक्ष होते. चेहºयांवरील हावभाव, कनिष्ठांचे मध्येच वरिष्ठांकडे सूचकपणे बघणे या बाबी पालकमंत्री टिपत होत्या. एका मुद्द्यावर त्या निर्देश देत असताना, अचानक त्यांनी महापालिकेचे उपायुक्त विजय कोराटे यांना, साहेब तुमचे मत काय, असा सवाल केला. कोराटे सतर्क झाले. त्यावर तुमच्या चेहरा मला प्रश्नांकित दिसला म्हणून विचरले, असे पालकमंत्री म्हणाल्या.

गाडगेनगरातील वाहतुकीचे केले चित्रण
्नगाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्गावर कोणीही कसेही वाहने चालवतात. कोण कुणावर येऊन धडकेल आणि अपघात होऊन मरेल, काहीच सांगता येत नाही. वाहनांची प्रचंड गर्दी, रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग, अतिक्रमण आदी समस्यांनी गाडगेनगर परिसर गिळंकृत झाला आहे, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी समस्येचे चित्रण केले. इर्विन चौक, राजापेठ, अंबादेवी चौकांतील धोकादायक वाहतूक आणि अतिक्रमणाचाही त्यांनी उल्लेख केला.

Web Title: Illegal alcohol, get rid of Gutkha within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.