झाडांचा पालापाचोळा जाळणे बेकायदेशीर

By admin | Published: April 3, 2017 12:21 AM2017-04-03T00:21:05+5:302017-04-03T00:21:05+5:30

दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. मात्र आता झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, ....

Illegal to burn the trees | झाडांचा पालापाचोळा जाळणे बेकायदेशीर

झाडांचा पालापाचोळा जाळणे बेकायदेशीर

Next

हरित लवादाचा निर्णय : वनविभागाकडून नियमांना छेद
अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. मात्र आता झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. परंतु वनविभागाने अद्यापही हरित लवादाच्या निर्णयाचे पालन केले नसल्याचे वास्तव आहे.
वर्धमान कौशिक आणि संजय कुलक्षेत्र यांनी युनियन आॅफ इंडिया व इतर यांच्याविरुद्ध दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केलेल्या याचिका क्र. २४ /२०१४ नुसार मे २०१५ मध्ये दिलेल्या निकालानुसार झाडांचा पालापाचोळा जाळण्यास सक्त मनाई आहे. तसेच जंगल शेजारी असलेल्या विटभट्टी, शेतातील काडीकचरा, फॅक्टरी आदींवर आगीसंदर्भात निर्बंध लादण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील २९ महापालिका, ३५३ नगरपरिषद, नगरपालिकांना तसेच ४४ हजार गावांमध्ये लागू करण्यात आला आहे. झाडांचा पालापाचोळा जाळल्यानंतर होणारे नुकसान हे गंभीर असल्याचे राष्ट्रीत हरित लवादाने निकालात म्हटले आहे. जंगलशेजारील शेतात आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक होते. हे गवत जळताना त्यासोबत किटक नाशक, तृणभक्षी पक्षी नामशेष होतात. परिणामी किटक नाशक, तृणभक्षी पक्षांवर अवलंबून असलेले वनप्राण्यांची संख्या आगीमुळे रोडावते. जंगलशेजारील शेतात पालापाचोळा जाळताना आगीच्या चिंगारीने हजारो हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे उदाहरण यापूर्वी घडले आहे. तर काही भागात जंगलाना काठेवाडी आणि धनगरांनी गुरांच्या चाऱ्यासाठी आग लावण्याचे प्रकार देखील घडवून आणले आहेत. त्यामुळे दरवर्षी वनविभाग आगीपासून जंगलाचा बचाव करण्यासाठी जाळरेषा तयार करते. यात महसूल विभाग ६ मीटर, तालुकास्तरावर १२ मीटर तर घनदाट जंगलात ४० मिटरची जाळरेषा तयार करुन जंगलांना आगीपासून वाचविले जाते. जंगलांना आगीपासून बचाव करण्यासाठी १९८२ पासून नियम अस्तित्वात आले आहे. मात्र जंगलांना आग लागण्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असताना वनविभागाने कारवाई केली नाही, अशी माहिती आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल याचिकेवर निर्णय देताना झाडांचा पालापाचोळा जाळण्याबाबत निर्बंध लादण्यात आले आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार, न्या. यू. डी. साल्वी, डी. के. अग्रवाल, ए.के. युसूफ, बी.एस. सजवन या सदस्यांनी झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई केली आहे. (प्रतिनिधी)

डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळणे धोकादायक
महानगरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे डपिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळून टेकडी कमी करण्याची शक्कल लढविली जाते. मात्र कचरा जाळताना निघणारा हा धूर अनेक आजार नागरिकांना देऊन जातो, असे राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे. त्यामुळे महापालिकांनी डपिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळू नये. तसे आढळल्यास वनविभागाने कारवाई करावी, असे निर्देशित करण्यात आले आहे.

वनांचे क्षेत्र घटण्याचे कारण
वनजमिनींचे वाटप, वनसंवर्धन कायद्यातंर्गत वनजमिनीचे वाटप, महसूल विभागाकडे वनजमिन ताब्यात, वनहक्क कायद्यातंर्गत वनजमिनीचे वाटच, सामुहिक दाव्याप्रमाणे वनजमिनीचे वाटप, वनजमिनीवर अतिक्रमण.

Web Title: Illegal to burn the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.