पाइप लाईनमध्ये कंचे टाकून अवैध जोडणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:12 AM2018-09-07T01:12:17+5:302018-09-07T01:14:25+5:30

अवैध नळांवाटे होणाऱ्या पाणीचोरीला वैतागलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठेकेदारांनी आता कंचे टाकून पाणी बंद करण्याची नवी शक्कल लढविली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीचोरी थांबविण्यासाठी विशेष मोहीम सुरु असून, आतापर्यंत ८८९ अवैध नळ जोडण्या कापण्यात आल्या आहेत.

Illegal connection discontinued by entering the pipe line in the pipeline | पाइप लाईनमध्ये कंचे टाकून अवैध जोडणी बंद

पाइप लाईनमध्ये कंचे टाकून अवैध जोडणी बंद

Next
ठळक मुद्दे८८९ नळजोडण्या कापल्या : पाणीचोरी थांबविण्यासाठी ठेकेदारांची अजब शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अवैध नळांवाटे होणाऱ्या पाणीचोरीला वैतागलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठेकेदारांनी आता कंचे टाकून पाणी बंद करण्याची नवी शक्कल लढविली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीचोरी थांबविण्यासाठी विशेष मोहीम सुरु असून, आतापर्यंत ८८९ अवैध नळ जोडण्या कापण्यात आल्या आहेत.
मजीप्राची ९० हजारांवर ग्राहकसंख्या असून, चार ते पाच हजार अवैध नळ जोडणी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न पाहता, अवैध नळ जोडणी घेऊन काही व्यक्ती पाण्याची नासाडी करीत असल्याचे शहरात ठिकठिकाणी आढळून आले आहे. या अनुषंगाने अवैध पाणी वापरावर अंकुश लावण्यासाठी मजीप्राने आता विशेष पथक तयार करून नळ जोडण्या कापण्याचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे. मजीप्राचे २० जणांचे पथक, सोबत ठेकेदारांची माणसे आणि उपअभियंता अशी चमू शहरातील विविध भागांत फिरून अवैध नळ जोडण्या कापण्याचे काम करीत आहे. अशावेळी अवैध नळ जोडणी घेणाऱ्यांकडून पाणीपुरवठा थेट बंद करताना मजीप्राला प्रचंड विरोध केला जात आहे. दररोज अनेक जण हुज्जत घालून, अरेरावी करीत नळ जोडणी कापण्यास विरोध करीत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पोलीस संरक्षण मागवून नळ जोडण्यात कापण्यात येत आहे. मात्र, पोलीस संरक्षणातही प्रत्येक ठिकाणी नळ कापणे शक्य नसल्यामुळे ठेकेदारांनी अजब शक्कल लढवित आहे. मुख्य पाइप लाइनमधून अवैध नळ घेणाºयांच्या पाइपला बूच लावण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी, तर अवैध नळ जोडणीधारकांच्या पाइप लाइनमध्ये कंचे टाकून पाणीपुरवठा बंद केला जात आहे. सद्यस्थितीत शहरातील ८८९ जणांचे अवैध नळजोडण्या मजीप्राने बंद केले आहे.

स्लम एरियात प्रचंड विरोध, राजकीय हस्तक्षेप
शहरातील गांधी आश्रम, गडगडेश्वर, सबनिस प्लॉट, नागपुरी गेट, लालखडी, आदिवासीनगर येथील स्लम एरियात अवैध नळ जोडण्या मजीप्राने बंद केल्या. याप्रसंगी काही ठिकाणी नागरिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. याप्रकरणी नागपुरी गेट हद्दीत एका जणाविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. अवैध नळ जोडणी कापताना राजकीय हस्तक्षेपाचाही सामना मजीप्रा करावा लागला. त्यामुळे अवैध जोडणी कापताना मजीप्राने पोलीस सुरक्षा मागविली आहे.

पाणीचोरीचे वाढते प्रमाण पाहता, अवैध नळ जोडण्या कापण्याचे काम युद्धस्तरारवर सुरु आहे. त्यासाठी २० जणांचे विशेष पथक तयार केले आहे. अवैध नळ कापताना प्रचंड विरोध होत आहे.
- किशोर रघुवंशी
उपविभागीय अभीयंता, मजीप्रा

अवैध नळ जोडण्या कापताना नागरिक आक्रमक होतात. त्यामुळे त्यांच्या पाइप लाइनमध्ये बुच किवा कंचे टाकून पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे.
- पी.एल. ततंरपाळे
नळ कारागीर-कंत्राटदार

Web Title: Illegal connection discontinued by entering the pipe line in the pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी