वनजमिनीवर अवैध उत्खन्नन वनविभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:26 AM2019-07-25T01:26:43+5:302019-07-25T01:28:06+5:30
वनजमिनीवर अवैध उत्खन्नन करणाऱ्या रवि इन्फ्रास्ट्रक्चरवर वनविभागाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. वनविभागाने जेसीपीसह लोखंडी साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वनजमिनीवर अवैध उत्खन्नन करणाऱ्या रवि इन्फ्रास्ट्रक्चरवर वनविभागाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. वनविभागाने जेसीपीसह लोखंडी साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमरावती ते चांदूर रेल्वे दरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, पोहरा मार्गावर रवि इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे बुधवारी वनजमिनीवर अवैध उत्खनन केले जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरएफओ कैलास भुंबर यांच्या नेतृृत्वात वनविभागाचे आर.एन. घागरे, टी.बी. फरतोडे, एस.बी. तिखीले, एस.एम. काळबांडे, विनोद कोहळे, किशोर धोटे, के.आर. धोत्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी जेसीपीद्वारे वनजमिनीवर नालीचे खोदकाम केले जात असल्याचे निदर्शनास आले.
वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोदकाम करणाºयांना परवानगीविषयी विचारणा केली असता, त्यांच्याकडे खोदकामाची परवानगी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वनविभागाने जेसीपीसह अन्य लोखंडी साहित्य जप्त केले. या कारवाईदरम्यान संबंधित कंत्राटदार पुढे आले नसल्यामुळे वनविभागाने रवि इन्फ्रास्ट्रक्चरविरुद्ध वनसंवर्धन अधिनियम १९८० ची कलम २ व १९२७ नुसार कलम २६ नुसार गुन्हा नोंदविला. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.