समृद्धीच्या कामात अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:07+5:30
कंपनीकडे मुरूम उत्खननाची कोणतीही परवानगी नव्हती. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता उत्खनन सुरू होऊन शेकडो ब्रास मुरू म टिप्परने भरू न महामार्गाच्या कामावर नेण्यात आला. गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. परंतु तहसीलदारांची चमू घटनास्थळी येईस्तोवर संबंधित कंपनीने पोकलँडसह ट्रक गायब केले. त्यामुळे २७ मे रोजी कुठलीच कारवाई होऊ शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणा रामनाथ : येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातून परमहंस कंस्ट्रक्शन कंपनीने अवैध उत्खनन चालवले आहे. तेथील शेकडो ब्रास मुरूम टिप्परच्या साह्याने वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामावर जात आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तेथे तीन जिल्ह्यांची सीमा आहे. परमहंस कंस्ट्रक्शन कंपनीकडे वाशीम जिल्ह्याचे काम आहे. सदर महामार्गाच्या कामात मुरूमाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. येथील गणेशपूर सिंचन प्रकल्प समृद्धी महामार्गाच्या जवळ असल्याने संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतातून ट्रक जाण्यासाठी रस्ता तयार केला. दोन पोकलॅन्ड आणि सात ट्रक मुरू म भरण्यासाठी प्रकल्पावर नेण्यात आले. विशेष म्हणजे कंपनीकडे मुरूम उत्खननाची कोणतीही परवानगी नव्हती. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता उत्खनन सुरू होऊन शेकडो ब्रास मुरू म टिप्परने भरू न महामार्गाच्या कामावर नेण्यात आला. गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. परंतु तहसीलदारांची चमू घटनास्थळी येईस्तोवर संबंधित कंपनीने पोकलँडसह ट्रक गायब केले. त्यामुळे २७ मे रोजी कुठलीच कारवाई होऊ शकली नाही. सदर प्रकल्प हा धानोरा ते वाढोणा मार्गावर आहे. प्रचंड वजनाचा ट्रक मुरू म भरू न या रस्त्यावरून नियमित ये-जा करीत आहे. त्यामुळे या रस्त्याची चाळण होऊन पूर्णत: दुर्दशा झालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प बडनेरा यांनी वारंवार एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांना मुरुमांनी भरलेल्या ट्रक-टिप्परची या मार्गावरील वाहतूक थांबविण्यासंदर्भात पत्र दिले. मात्र, अधिकाºयांनी पत्राला न जुमानता वाहतूक सुरूच ठेवली. सगळीकडे कोरोनाचा कहर वाढत असतानासुद्धा कामावरील मजुरांना मास्क नाही, फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे.