राष्ट्रीय महामार्गासाठी पिवळ्या मातीचे अवैध खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:26 PM2018-04-03T22:26:58+5:302018-04-03T22:26:58+5:30
तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात मुरूमऐवजी पिवळ्या मातीचा वापर केला जात आहे. या खननाकरिता उपविभागीय अधिकाºयांनी परवानगी दिली असून, कंत्राटदार एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रकद्वारा खनन करीत असल्याचा आरोप होत आहे. या रॉयल्टीवर तालुक्याचा व संबंधित गावाची माहितीच नाही. त्यामुळे या रॉयल्टी पासेस संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.
सुमीत हरकूट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात मुरूमऐवजी पिवळ्या मातीचा वापर केला जात आहे. या खननाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, कंत्राटदार एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रकद्वारा खनन करीत असल्याचा आरोप होत आहे. या रॉयल्टीवर तालुक्याचा व संबंधित गावाची माहितीच नाही. त्यामुळे या रॉयल्टी पासेस संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.
सध्या तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात पिवळ्या मातीचा वापर केला जात आहे. याचे खनन मौजा पिंपळखुटा, कुरळपुर्णा येथून केले जात आहे. पिवळ्या मातीकरिता कंत्राटदाराने जमिनीपासून ३० ते ४० फूट खोल खोदून खनन केले आहे. याकरिता उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी परवानगी दिल्याची माहिती आहे. उपविभागीय कार्यालयातर्फे दिलेल्या रॉयल्टी वर खनन होत असलेल्या गावाची कोणतीच माहिती नसून कोºया रॉयल्टी पासेस देण्यात आल्या आहेत. या पासेसचा वापर ट्रकचालक ३ ते ४ वेळी करीत असल्याची माहिती स्वत: ट्रकचालकाने दिली. त्यामुळे हे उत्खनन नियमबाह्य असताना महसूल विभाग याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
अवैध खनन व रॉयल्टी पासच्या गैरवापरासंदर्भात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.