चांदूरमध्ये हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल
By admin | Published: October 16, 2014 11:18 PM2014-10-16T23:18:54+5:302014-10-16T23:18:54+5:30
तालुक्यातील शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, आसेगावपूर्णा, हिरूळ, सर्फाबाद,तळवेल या गावांमध्ये सर्रास हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे. ही झाडे तोडून त्यांची लाकडे
चांदूर बाजार : तालुक्यातील शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, आसेगावपूर्णा, हिरूळ, सर्फाबाद,तळवेल या गावांमध्ये सर्रास हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे. ही झाडे तोडून त्यांची लाकडे तालुक्यातील तसेच अमरावती शहरातील आरागिरण्यांमध्ये विकली जात आहेत.
चांदूरबाजार, जमापूर, शिरजगाव कसबा, घाटलाडकी येथील लाकडांच्या व्यवसासियांककडून हिरव्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे चित्र आहे. याबाबत गावातील वृक्षप्रेमींनी अनेकदा तक्रारी केल्या. गेल्या वर्षीच्या हंगामात चांदूरबाजार तालुक्यात हजारोंच्या संख्येने जीवंत झाडांची कत्तल झाली असून ही लाकडे अमरावती येथील आरागिरण्यांवर नेऊन विकली आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पडगव्हाणकर यांनी चांदूरबाजार येथील जनता सॉ मिल व आलिफ सॉ मिलची आकस्मिक तपासणी केली होती. त्यावेळी आलिफ सॉ-मिलमध्ये अवैधरित्या कापलेल्या झाडांचे ओंडके आढळले होते.
याबाबत कारवाई करण्याचे आदेश पडगव्हाणकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली हिरव्या झाडांची कत्तल तत्काळ थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)