मेळघाट वनविभागात सागवान वृक्षांची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 08:45 PM2019-06-21T20:45:41+5:302019-06-21T20:45:56+5:30

दहिगाव वर्तुळात ७ लाख ८५ हजारांची वृक्षतोड : दोन वनरक्षकांसह वनपाल निलंबित 

Illegal slaughter of saffron trees in the Melghat forest section | मेळघाट वनविभागात सागवान वृक्षांची अवैध कत्तल

मेळघाट वनविभागात सागवान वृक्षांची अवैध कत्तल

googlenewsNext

परतवाडा : मेळघाट वनविभागात सागवान वृक्षांची अवैध कत्तल सुरूच आहे. बिहाली, भांडूम-एकताई यानंतर आता दहिगाव वर्तुळात ७ लाख ८५ हजारांची अवैध वृक्षतोड उघड झाली आहे. यात दोन वनरक्षकांसह वनपालांना निलंबित करण्यात आले आहे.


मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग, परतवाडा अंतर्गत संवेदनशील अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अतिसंवेदनशील दहिगाव वर्तुळात खिरपाणी आणि काकादरी बीटमध्ये चोरट्यांसह अतिक्रमितांनी हैदोस घातला आहे. यात पाच वनगुन्हे दाखल करण्यात आलेत. दहिगाव वर्तुळाचे वनपाल सुधीर हाते आणि खिरपाणी बीटचे वनरक्षक सुरेश बनारसे, काकादरी बीटचा अतिरिक्त प्रभार असलेले वनरक्षक विजय चव्हाण यांना वनविभागाने निलंबित केले आहे.


दहिगाव वर्तुळातील काकादरी बीटमध्ये ११ एप्रिलला दाखल गुन्ह्यात चोरट्यांनी २४ सागवान वृक्षांची कत्तल करीत ६२ हजार १०० रुपयांचे नुकसान केले. ११ जूनला दाखल गुन्ह्यात ७० सागवान वृक्षांची कत्तल करीत २ लाख ४८ हजार ५७४ रुपयांचे नुकसान केले. याच काकादरी बीटमध्ये अतिक्रमितांकडून १० हेक्टरहून अधिक क्षेत्रात वृक्षतोड करण्यात आली. २० ते २५ लोकांच्या जमावाकडून सामूहिक अतिक्रमण सुरू आहे. यात १४ जूनला दाखल वनगुन्ह्यात ५८ हजार ५६८ रुपयांचे, तर १६ जूनला दाखल वनगुन्ह्यात १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. खिरपाणी बीटमध्ये ५ मे रोजी दाखल वनगुन्ह्यात चोरट्यांनी ७२  सागवान वृक्षांची कत्तल करीत २ लाख ६५ हजार ९६२ रुपयांचे नुकसान केले. या दाखल पाच वनगुन्ह्यांत एकूण ७ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


१८ लाखांची वृक्षतोड
वर्षभरात मेळघाटात १८ लाखांहून अधिक नुकसान या अवैध वृक्षतोडीत चोरट्यांनी केले आहे. ही केवळ उघड झालेली वृक्षतोड आहे. काही महिन्यांपूर्वी घटांग वनपरिक्षेत्रातील बिहाली वर्तुळात ५ लाख ३८ हजारांची, तर जारिदा वनपरिक्षेत्रांतर्गत भांडूम-एकताई परिसरात ३ लाख ७९ हजारांची अवैध वृक्षतोड निदर्शनास आली आहे. ही दोन्ही प्रकरणे ताजी असतानाच दहिगाव वतुर्ळातील ७ लाख ८५ हजारांच्या वृक्षतोडीने भर घातली आहे.

मदतनीस नाहीत
संवेदनशील अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अतिसंवेदनशील दहिगांव वर्तुळात सात बीट आहेत. यातील एकाही बीटमधील वनरक्षकांकडे मदतनीस म्हणून वनमजूर नाहीत. ते सर्व वनमजूर व्याघ्र प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

शस्त्रांची मागणी 
दहिगाव वर्तुळातील वनपालासह वनरक्षकांनी अतिसंवेदनशील क्षेत्रातील जंगलतोडीला आळा घालताना चोरट्यांवर वचक बसविण्याकरिता वनअधिकाºयांकडे बरेचदा शस्त्रांची मागणी केली आहे. वनपालाने पिस्तोल, तर वनरक्षकाने बंदूक (रायफल) मागितली. पण, त्यांना ती शस्त्रे दिली गेली नाहीत.

शस्त्रे कपाटात
मेळघाट प्रादेशिक वनविभागाकडे जवळपास १५ ते २० शस्त्रे आहेत. त्यात काही पिस्तोल तर काही बंदूका (रायफल) आहेत. यातील काही बंदूका आरएफओंकडे पडून आहेत. पिस्तोल तर वनअधिकाºयांच्या अनिनस्त गोदरेजच्या कपाटात बंद आहेत.

राखीव पोलीस दल
दहिगाव वर्तुळातील काकादरी बीटमध्ये होत असलेल्या सामूहिक अतिक्रमणावर अंकुश लावण्याकरिता, जंगलतोड थांबविण्याकरिता राज्य राखीव पोलीस दलाची मागणी क्षेत्रीय वनकर्मचाºयांनी वनअधिकाºयांकडे केली आहे. राखीव पोलीस दल येईस्तोवर त्या भागात कॅम्प लावण्याकरिता अतिरिक्त तसेच  आवश्यक मनुष्यबळाची मागणीही त्यांनी  केली. पण, क्षेत्रीय वनकर्मचाºयांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

वनअधिकाºयांचे दुर्लक्ष
वनविभागाच्या मापदंडानुसार सहायक वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांनीही नियत क्षेत्रात नियमित भेटी देऊन अवैध वृक्षतोडीवर लक्ष केंद्रित करायला हवे. वनसंरक्षणार्थ उपाययोजना करणे आवश्यक ठरतात. परतवाडा उपवनसंरक्षक व सहायक वनसंरक्षकांच्या मुख्यालयापासून बिहाली तर मुख्य रस्त्यावर आहे. मापदंड असतानाही मेळघाटातील अवैध वृक्षतोड थांबण्याचे नाव घेत नाही. यात वनअधिकाºयांचे दौरे व नियत क्षेत्राच्या भेटी चर्चेत आल्या आहेत.

Web Title: Illegal slaughter of saffron trees in the Melghat forest section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट