चांदूर रेल्वे येथे अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:55 PM2018-04-05T21:55:39+5:302018-04-05T21:55:39+5:30

शहरातील डांगरीपुरा येथील कुरेशी मोहल्ल्यातील अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश चांदूर रेल्वे पोलिसांनी केला. येथून अडीच क्विंटल गोमांस पकडले असून, पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

 Illegal slaughterhouse busted at Chandur railway | चांदूर रेल्वे येथे अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश

चांदूर रेल्वे येथे अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्दे अडीच क्विंटल गोमांस पकडले : पोलिसांनी घेतले पाच जणांना ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : शहरातील डांगरीपुरा येथील कुरेशी मोहल्ल्यातील अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश चांदूर रेल्वे पोलिसांनी केला. येथून अडीच क्विंटल गोमांस पकडले असून, पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय काही जनावरांची सुटका करण्यात आली.
कुरेशी मोहल्ल्यात अवैध कत्तलखाना असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीवरून पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा परिसर गाठला. येथे १० बाय १५ आकाराच्या टिनाच्या शेडमध्ये पाच जण गोवंशाची कत्तल करून साफसफाई करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मो. इसराईल शे. कादर (४१), अ. बहीद शहजादा (४७), जीमल अहमद अकिल अहमद (३६) मो. परवेज मो. हारूण (२०) आणि मो. इस्माईल शे. कादर (रा. सर्व कुरेशी मोहल्ला) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी एकूण ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक ब्रह्मदेव शेळके यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक श्यामराव जाधव, हेडकॉन्स्टेबल विनोद डाकोरे, नायक सतीश मडावी, महिला नायक नंदा कुंभलकर, शीला सूर्यवंशी, शरद खेडकर, कॉन्स्टेबल अरुण भुरकाडे, रमेश चारपगार, शिपाई पंकज शेंडे यांनी केली.
गोवंशाची सुटका
चांदूर रेल्वे पोलिसांनी येथून सात जनावरांची सुटका केली. यामध्ये एक वर्ष वयाची वगार, जरसी कालवड, दोन गावरान कालवडी तसेच सहा महिन्याच्या दोन कालवडींचा समावेश आहे.
 

Web Title:  Illegal slaughterhouse busted at Chandur railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.