जनावरांची अवैध वाहतूक, वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:38 AM2018-06-15T01:38:25+5:302018-06-15T01:38:25+5:30

बाजार समितीच्या आवारातून रविवारी सायंकाळी जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी स्थानिक पोलिसांनी स्थानिक कर्मचाऱ्यांसह आरोपींना अटक केली होती. ठाणेदार समीर शेख यांनी चौकशीसाठी थेट सभापती व संचालकांना समन्स जारी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले.

Illegal traffic of animals, the atmosphere washed | जनावरांची अवैध वाहतूक, वातावरण तापले

जनावरांची अवैध वाहतूक, वातावरण तापले

Next
ठळक मुद्देचांदूरबाजार : बाजार समितीच्या सभापतींना समन्स

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : बाजार समितीच्या आवारातून रविवारी सायंकाळी जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी स्थानिक पोलिसांनी स्थानिक कर्मचाऱ्यांसह आरोपींना अटक केली होती. ठाणेदार समीर शेख यांनी चौकशीसाठी थेट सभापती व संचालकांना समन्स जारी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले. यातच बबलू देशमुख गटाची एकछत्री सत्ता असलेल्या बाजार समिती संचालकांनी आ. बच्चू कडू यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
स्थानिक बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारातून रविवारी जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार समीर शेख यांनी अमरावती येथे कापण्याकरिता नेत असलेल्या २२ गोवंशांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्यासह सहा आरोपींना अटक केली. एक अद्यापही फरार आहे. कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविले. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करीत असून, बाजार समितीच्या आवारातील या घटनेला जबाबदार सचिव व दोन संचालकांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, सभापतींसह अन्य संचालकाची चौकशी का नाही, अशी चर्चा सुरू आहे. दोन संचालकांच्या चौकशीने अन्य संचालकांचे धाबे दणाणले आहे. पोलीस चौकशीला आपण बळी पडू नये यासाठी बाजार समिती सभापतींसह सर्व संचालक आ. बच्चू कडूंना भेटून प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली. या बैठकीमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बाजार समितीतून हा प्रकार नेमका कधीपासून सुरू झाला, याला पाठबळ कोणाचे, हे मात्र चौकशीतून लवकरच समोर येईल.

Web Title: Illegal traffic of animals, the atmosphere washed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.