अंजनगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:28+5:302021-06-18T04:09:28+5:30

फोटो पी १७ ट्री कटिंग अंजनगाव सुर्जी : अंजनगाव तालुक्यात विविध प्रकारच्या जातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून ...

Illegal tree felling in Anjangaon taluka | अंजनगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड

अंजनगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड

Next

फोटो पी १७ ट्री कटिंग

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव तालुक्यात विविध प्रकारच्या जातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तालुक्यात चर्चा आहे

अंजनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून वेगवेगळ्या वन्य जातींचे मोठमोठे वृक्ष या परिसरात आढळून येतात. या वृक्षांचे आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा आहे. मात्र, बेसुमार होणाऱ्या अवैध कत्तलीमुळे अंजनगाव परिसरातील वनसंपदा धोक्यात आली आहे. अंजनगाव शहरात मोठ्या प्रमाणात आड जातींच्या लाकडाचे ट्रक भरून येत असून राजरोसपणे कटाई करून विक्री करत असल्याचे चित्र दिसत आहे.

वनविभाग तक्रारी देऊनसुद्धा डोळेझाक करत असल्याचे मत धनेगाव येथील शेतकऱ्याने व्यक्त केले आहे. एक महिन्यापूर्वी धनेगाव येथील शेतकरी मोहन हिवसे यांनी बांधावरचे झाड तोडून नेल्याची तक्रार परतवाडा वनविभाग कार्यालयात केली होती. एक महिना उलटून सुद्धा वनविभागाने साधी चौकशीही केली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाबद्दल खंत व्यक्त केली आहे.

बाॅक्स......

अंजनगाव परिसरात वनविभागाचे कार्यालय असून ते नावापुरतेच आहे. अंजनगाव परिसराचा भाग हा परतवाडा कार्यालयातून सांभाळणे म्हणजे चाळीस किलोमीटर अंतरावरून शेळ्या हाकणे आहे. अंजनगाव परिसरासाठी कायमस्वरूपी आरएफओ अधिकारी असणे गरजेचे आहे. या परिसराला एक वर्षापासून आरएफओ अधिकारी कायमस्वरूपी नसल्याने या परिसराकडे दुर्लक्ष होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Illegal tree felling in Anjangaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.