आयएमएचा संप सुरूच
By admin | Published: March 25, 2017 12:09 AM2017-03-25T00:09:31+5:302017-03-25T00:09:31+5:30
संप दोन्ही संघटनांचा सुरू असताना शासन मात्र ‘मार्ड’सी बोलनी करीत आहे. 'आयएमए'शी संवाद नाही.
वसंत लुंगे यांची माहिती : प्रोटेक्शन अॅक्ट २०१० साठी एकवटले डॉक्टर
अमरावती : संप दोन्ही संघटनांचा सुरू असताना शासन मात्र ‘मार्ड’सी बोलनी करीत आहे. 'आयएमए'शी संवाद नाही. त्यामुळे आम्ही मागण्यांवर ठाम आहोत. 'आयएमए'चा संप सुरू राहणार असल्याचे 'आयएमए'चे जिल्हाध्यक्ष वसंत लुंगे यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी विविध मागण्यांसाठी शेकडो डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
राज्यात डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट २०१० लागू करण्यात आला मात्र अंमलबजावणी नाही. हा नॉनबेलेबल गुन्हा आहे. या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे करण्यात आली. धुळ्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेली मारहाण ही निंदनीय आहे. या प्रकरणातील दोषी विरोधातील खटला फॉस्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी डॉक्टरांनी यावेळी केली. धुळ्यातील रुग्णालय 'अपडेट' नव्हते. तिथे रुग्णांसाठी सुविधा नव्हत्या. ही सर्व शासनाची जबाबदारी असल्याचे यावेळी 'आयएमए'ने स्पष्ट केले. तसेच २०१० च्या अॅक्टसंदर्भात शासनाने जनजागृती करावी, असे निवेदनात नमूद आहे. अमरावती येथील पीडीएमसी निवासी डॉक्टर संपावर आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात रुग्णांच्या सेवेसाठी अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. इर्विन, डफरीन रुग्णालयातदेखील अत्यावश्यक सेवा व ओपीडी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)