वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात नर-मादी गुणोत्तरात असंतुलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:03+5:302020-12-29T04:12:03+5:30
पोहरा बंदी : बिबट्यांचे अधिराज्य असलेल्या वडाळी-चांदूर रेल्वे जंगलात या प्राण्याच्या नर-मादी गुणोत्तराचे असंतुलन निर्माण झाले आहे. या दोन्ही ...
पोहरा बंदी : बिबट्यांचे अधिराज्य असलेल्या वडाळी-चांदूर रेल्वे जंगलात या प्राण्याच्या नर-मादी गुणोत्तराचे असंतुलन निर्माण झाले आहे. या दोन्ही वनपरिक्षेत्रात १३ वर्षांत विविध घटनांमध्ये दगावणाऱ्या १३ बिबट्या मध्ये मादीची संख्या नरापेक्षा जास्त आहे.
वडाळी वनपरिक्षेत्रातील एका मादी बिबट्याला महिनाभरापूर्वी गोरेवाडा येथे स्थलांतरित करण्यात आले होते. अशाप्रकारे १४ बिबट्यांची संख्या वडाळी आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातून कमी झाल्याची आकडेवारी आहे. वडाळी आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील पोहरा-चिरोडी, माळेगाव, वडाळी चांदूर रेल्वे हे जंगल बिबट्यांसाठी नेहमीच अनुकूल राहिले. पोहरा, चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे, वडाळी, बडनेरा या जंगलात वाघाचे अस्तित्व नाही. तथापि, पोहरा-चिरोडी जंगलात असलेल्या बिबट्यांची संख्या पन्नाशीच्या पुढे कधी गेलेली नाही. उघड्या विहिरींमध्ये पडल्याने, रस्ता अपघातात नर-मादी बिबट्याचा हकनाक बळी गेल्याच्या नोंदी वनविभागाकडे आहेत. या १३ वर्षांमध्ये एकूण १३ बिबट्यांचा वडाळी आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात मृत्यू झाला. सावज आणि पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना मृत्युमुखी पडलेल्या मादी-नर बिबट्याची संख्या जास्त आहे.
बॉक्स
असा गेला बळी
वडाळी वनपरिक्षेत्रातील भवानी तलाव जंगल परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. नागपूर-अकोला हायवेवर अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. वैष्णोदेवी मंदिर परिसरात रस्ता अपघातात एक बिबट्या दगावला. धबधबा पूलाजवळ रस्ता अपघातात एका बिबट ठार झाला. वाघामाई परिसरात एक बिबट रस्ता अपघातात ठार झाल्याची नोंद वडाळी वनविभागाने घेतली आहे.
बॉक्स
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील बळी
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील कुऱ्हा, शिवरातील एका शेतातील विहिरीत पडून बिबट दगावला. मार्डी जंगल परिसरात तो मृतावस्थेत आढलेला होता. पाथरगाव जंगल परिसरात एका शेतात बिबट्याचा मृत्यू झाला. तिवसा परिसरातील तारेच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला. शेंदूरजना खुर्द परिसरात एका शेतात बिबट्या मृत्युमुखी प़डला. वाढोणा परिसरात एका शेताच्या विहिरीत बिबट्या बुडाला. चिरोडी जंगलात तसेच चिरोडी जंगल लगतच्या एका वाडीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. यामध्ये वडाळी आणि चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रांतील १३ वर्षांत १४ तर मादी बिबट घटले आहे.