मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:07+5:302021-06-10T04:10:07+5:30

अमरावती : मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामांची गतीने पूर्तता करा, अशा सूचना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी बुधवारी महावितरणच्या ...

Immediate pre-monsoon electrical system repair work | मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे तातडीने करा

मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे तातडीने करा

googlenewsNext

अमरावती : मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामांची गतीने पूर्तता करा, अशा सूचना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी बुधवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भूमिगत वाहिन्यांच्या चाचपणीकरिता महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महानगर अंतर्गत प्रभाग क्रमांक २ संत गाडगेबाबा-पीडीएमसी प्रभागातील गाडगेनगर सहित विविध भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अवकाळी तसेच वादळी पावसामुळे महावितरणसह वीज ग्राहकांना विद्युत लपंडावाच्या समस्येचा सामना करावा लागत होता. दरम्यान विद्युत तारांना स्पर्श झालेल्या व झाडांच्या फांद्या कापण्याचे काम पूर्ण करण्यात येत होते. त्यासाठी जवळपास सर्व भागातील विद्युत पुरवठा रोजच महावितरणकडून बंद केल्या जात होता. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेकवेळा झाडे अथवा झाडाच्या फांद्या कोसळल्यामुळे विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आमदार खोडके यांनी गाडगेनगर भागात विद्युत पुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या सुरू असलेल्या कामाच्या स्थळी प्रत्यक्ष पाहणी केली.

विद्युत वाहिनीच्या आवश्यक दुरुस्तीची कामे दिनांक १४ व १५ जून ला पूर्ण करून त्या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, हि बाब असे महावितरण्या अभियंत्यांनी आमदारांना सांगितले. यावेळी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता शहर आनंद काटकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे, सहायक अभियंता परेश कनाटे, यश खोडके, महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ अनुप धर्माळे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Immediate pre-monsoon electrical system repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.