शाळेतील स्वाध्याय अभ्यासक्रमाला तूर्तास स्थगीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:19+5:302021-05-26T04:13:19+5:30
अमरावती : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वाध्याय उपक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ...
अमरावती : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वाध्याय उपक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुटीत हा उपक्रम बंद राहणार आहे.
लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद झाल्यानंतर व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचा अभ्यास पाठविला जात होता. विद्यार्थ्यांकडून विविध विषयानुसार स्वाध्याय सोडून घेतले जात असत. याबाबतची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली होती. १ मेपासून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, हा स्वाध्याय उपक्रम सुरूच होता. सध्या सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट दिसून येत आहे. अनेक घरी पालक संक्रमित आहेत. अशा परिस्थितीत स्वाध्याय उपक्रमाला ग्रामीण भागातून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे स्वाध्याय उपक्रमाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली होती. आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा उपक्रम तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत उपक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.