अकृषिक जागांना तातडीने परवानगी द्या

By admin | Published: December 31, 2015 12:11 AM2015-12-31T00:11:22+5:302015-12-31T00:11:22+5:30

जिल्ह्यात अकृषिक जागांना परवानगी मागण्यासाठी प्राप्त अर्जावर सकारात्मक कार्यवाही करुन संपुर्ण प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.

Immediately allow unskilled seats | अकृषिक जागांना तातडीने परवानगी द्या

अकृषिक जागांना तातडीने परवानगी द्या

Next

पालकमंत्री : रमाई आवास योजना बैठकीत निर्देश
अमरावती : जिल्ह्यात अकृषिक जागांना परवानगी मागण्यासाठी प्राप्त अर्जावर सकारात्मक कार्यवाही करुन संपुर्ण प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. अशा प्रकरणात अनावश्यक आक्षेप काढुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अकृषिक जागांना परवानगी देणे, रमाई आवास योजना संदर्भात झालेल्या कामांचा आढावा ना. पोटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी शिरसुद्धे, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, नगररचना, महानगरपालिका आदी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ना. पोटे म्हणाले की, शासन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. अकृषिक प्रकरणात कृषिवर आधारित उद्योग उभारणार असून यातून रोजगार प्राप्त होणार आहे. यासाठी संबंधित विभागांनी अकृषिक वापर सुरु करण्याची तातडीने परवानगी द्यावी. या कामात अडवणूक करणाऱ्या किंवा अनावश्यक आक्षेप काढणाऱ्यांवर सक्तीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
रमाई आवास योजनेंतर्गत झालेल्या घरकुल कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात १,७३९ घरकुले पुर्ण असुन १,१८६ घरकुलांचे काम प्रगतीपथवार आहे. तसेच महापालिका क्षेत्रात १,१५६ घरकुलांचे काम पुर्ण असुन १,०६३ कामे प्रगतीपथावर आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी २० कोटी रुपये निधीची आवश्यकता लागणार आहे. तसेच ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत १,१७८ घरकुलांचे काम पुर्ण झाले असुन ४,३२४ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे चव्हाण यांनी दिली.
अनुसुचित जाती, भटक्या जमातीच्या निराधार लोकांना तसेच कमी उत्पन्न गटातील लोकांना येत्या दोन ते तीन वर्षात घरकुले देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा. नगरपरिषद प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडे येणारी अकृषिक व घरकुल वाटपाची प्रकरणे सकारात्मकतेने निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Immediately allow unskilled seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.