शंकर महाराजांना तत्काळ अटक करा

By admin | Published: August 20, 2016 12:02 AM2016-08-20T00:02:13+5:302016-08-20T00:02:13+5:30

धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील आश्रमशाळेतील ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाला.

Immediately arrest Shankar Maharaj | शंकर महाराजांना तत्काळ अटक करा

शंकर महाराजांना तत्काळ अटक करा

Next

तिवसा : धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील आश्रमशाळेतील ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. या घटनेला प्रामुख्याने जबाबदार असलेले आश्रमशाळेचे संचालक शंकर महाराजांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा विचारमंच व विविध संघटनांद्वारे तहसील कार्यालयावर शुक्रवारी विशाल मोर्चा काढण्यात आला. 
विद्यार्थ्यांचा जीव जादू-टोण्यासाठी घेणाऱ्या या आश्रमशाळेत विद्यार्थी अजिबात सुरक्षित नाहीत. त्यामुळे या आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणीदेखील निवेदनातून करण्यात आली. या प्रकारासाठी जबाबदार असलेले आश्रमशाळेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांवरही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या आश्रमशाळेला व संस्थानला देणगी देणारे लब्धप्रतिष्ठित व राजकारणी आहेत. त्यांनी संस्थेला दिलेल्या संपत्तीची चौकशी व्हावी. हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा बहुजन समाज एकत्रित येऊन आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
येथील आंबेडकर भवनापासून मोर्चाला सुरूवात झाली. दुपारी ३ वाजता मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला. यावेळी महादेव गारपवार, दिलीप वानखडे, संजय देशमुख, राज माहोरे आदींनी मोर्चाला संबोधित केले. या मोर्चाला विदर्भ लहुजी सेना, मातंग समाज संघटना, तिवसा तालुका शाखा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, लढा संघटना, अण्णाभाऊ साठे संघटना आदींनी पाठिंबा दिला.
मागण्यांचे निवेदन तहसीलदार राम लंके यांना देण्यात आले. यावेळी देवीदास गायकवाड, भूषण यावले, अशोक गवळी, सूरज डहाट, आशिष ढोले, सतीश पारधी, संभाजी ब्रिगेडचे शेतू देशमुख, नीलेश खडसे, नामदेव तांबे, प्रदीप वाघमारे, रमेश बोके, शरद काळे, नारायण प्रधान आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

सगणे कुटुंबीयांना संरक्षण द्या
प्रथमेश सगणे व त्याच्या कुुटुंबियांना संस्थाचालक, आश्रमशाळेचे पदाधिकारी आदींपासून धोका आहे. त्यामुळे सगणे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या संस्थेत नरबळी यापूर्वीही नरबळी देण्याचा प्रकार घडला आहे. यासर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Immediately arrest Shankar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.