वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करा
By Admin | Published: April 18, 2017 12:28 AM2017-04-18T00:28:10+5:302017-04-18T00:28:10+5:30
मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करावी व गुंतवणूकदारांच्या ठेवी परत द्याव्या, ...
अमरावती : मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करावी व गुंतवणूकदारांच्या ठेवी परत द्याव्या, अशी मागणी सोमवारी मैत्रेय ग्राहक- प्रतिनिधी अन्याय निवारण समितीने जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सत्पाळकर यांनी २१ डिसेंबर रोजी रिर्झव्ह बँक आॅफ इंडियाचे प्रमाणपत्र मिळवून मैत्रेय कंपनी स्थापन केली. त्यानंतर याच माध्यमातून वेगवेगळया तीन कंपनीची स्थापना करून त्यामध्ये मोठया प्रमाणात मासिक, त्रैमासिक,सहामाई व वार्षिक अशा स्वरूपाच्या ठेवींच्या योजना आखून गोरगरीब कष्टकरी नागरिकांनी आपला मेहनतीचा पैसा यामध्ये ठेव म्हणून भरला आहे. मात्र या ठेवीची रक्कम अद्याप गुंतवणूकदारांना परत मिळाली नाही. त्यामुळे मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करा, अशी मागणी निवेदनाव्दारे अन्याय निवारण समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. यावेळी अरूण आंबेकर, अनिता वानखडे,रमेश खेडकर आदी उपस्थित होते.