शिरखेड येथे नानागुरू संस्थानच्या गणेशाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:53+5:302021-09-22T04:15:53+5:30
श्री संत नानागुरू देवस्थानचा गणपती उत्सवाची परंपरा १८ व्या शतकापासून चालू आहे. मंदिरातील बाप्पांचे १२ व्या दिवशी विसर्जन करून ...
श्री संत नानागुरू देवस्थानचा गणपती उत्सवाची परंपरा १८ व्या शतकापासून चालू आहे. मंदिरातील बाप्पांचे १२ व्या दिवशी विसर्जन करून देवस्थानच्यावतीने भाविक भक्तांसाठी दरवर्षी ३० क्विंटल ज्वारी आणि ५० क्विंटल कोहळ्याचा महाप्रसाद केला जातो. ज्वारीच्या कन्या व कोहळ्याची भाजीचा हा महाप्रसाद घेण्यासाठी परिसरातील भक्त गर्दी करतात. मात्र यावर्षी कोरोना संकट असल्यामुळे संस्थानच्यावतीने महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याऐवजी भाविक भक्तांच्या घरोघरी जाऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.
काशी नदीच्या तीरावर प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून गणपती विसर्जन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेडचे ठाणेदार विक्रांत पाटील, दुय्यम ठाणेदार स्वप्निल ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक पवन पवार, पोलीस अंमलदार मनोज टप्पे, बलवंत टाके, श्यामसिंह चुंगडा, राजेंद्र इंगळे, पंजाबराव केकन, रामेश्वर इंगोले, छत्रपती करपते, अनूप मानकर, विजय टेकोळे, उमेश कुंभेकर, अजयकुमार अडगोकर, अमित आवारे, पुंडकर मेजर, समीर, किरण लकडे, मानकर, रूपाली इंगोले, प्रीती शिंदे, ममता चव्हाण उपस्थित होत्या. जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र येथून पोलीस पथकसुद्धा आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.