पाणीटंचाई उपायांची अंमलबजावणी वेळेत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:17+5:302021-02-10T04:14:17+5:30

अमरावती : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर ...

Implement water scarcity measures on time | पाणीटंचाई उपायांची अंमलबजावणी वेळेत करा

पाणीटंचाई उपायांची अंमलबजावणी वेळेत करा

Next

अमरावती : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.

भातकुली तालुक्यातील टंचाई आराखड्याबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भातकुली पंचायत समिती कार्यालयात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. सभापती कल्पना चक्रे, उपसभापती अरविंद आकोलकर, जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, गणेश सोळंके, मयूरी कावरे, प्रदीप थोरात, जया तेलखेडे, उषा बोंडे, करुणा कोलटके, तहसीलदार नीता लबडे व गटविकास अधिकारी सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

पाण्याची टंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आवश्यक तजवीज करावी. यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. यासोबतच धामोरी, वायगाव, वाठोडा शुकलेश्वर, खारतळेगाव, पूर्णनगर, साऊर, रामा, सोनारखेड, आष्टी, अंचलवाडी, वातोंडा, निरूळ, वाकी या गावांमध्ये आवश्यकतेनुसार हातपंप उभारण्यासाठी प्रस्ताव द्यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बॉक्स

या विषयावर चर्चा

भातकुली तालुक्यातील बोरखडीपर्यंत शहानूर नळ योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी. मार्की व वातोंडा हिंमतपूर येथील शिकस्त झालेल्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती तातडीने करावी. उन्हाळ्याच्या दिवसांत कुठेही पाणीटंचाई भासू नये, यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूरक पाणीव्यवस्थेसाठी टाकीचे बांधकाम करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, अशा पालकमंत्र्यानी दिल्या आहेत.

Web Title: Implement water scarcity measures on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.