शासकीय कामात अडथळा, नगरसेवकाला दोन वर्षे कारावास 

By प्रदीप भाकरे | Published: February 4, 2023 07:57 PM2023-02-04T19:57:39+5:302023-02-04T19:58:09+5:30

विधी सूत्रांनुसार, २२ ऑगस्ट २०१५ रोजी नगर परिषद कार्यालयात तत्कालीन नगरसेवक बंडू आठवले, बच्चू वानरे, नगरसेविकाचे पती श्रीनिवास सूर्यवंशी हे तत्कालीन नगराध्यक्ष मंगेश खवले यांच्या कक्षात धडकले.

Imprisonment in government work, corporator imprisoned for two years | शासकीय कामात अडथळा, नगरसेवकाला दोन वर्षे कारावास 

शासकीय कामात अडथळा, नगरसेवकाला दोन वर्षे कारावास 

Next

चांदूर रेल्वे (अमरावती): शासकीय कामात अडथळा करीत मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बंडू पुंडलिकराव आठवले (रा. मिलिंदनगर, चांदूर रेल्वे) याला अमरावती येथील जिल्हा न्यायाधीश क्र. ६ एस.बी. जोशी यांनी दोन वर्षे कारावास ठोठावला. सात वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. 

विधी सूत्रांनुसार, २२ ऑगस्ट २०१५ रोजी नगर परिषद कार्यालयात तत्कालीन नगरसेवक बंडू आठवले, बच्चू वानरे, नगरसेविकाचे पती श्रीनिवास सूर्यवंशी हे तत्कालीन नगराध्यक्ष मंगेश खवले यांच्या कक्षात धडकले. बंडू आठवले याने आत्मदहनाचा इशारा देणारे पत्र दिले. खवले यांनी त्याचे वाचन करताच आठवले याने अर्वाच्य भाषेचा वापर करीत शिवीगाळ केली. खुर्च्यांची फेकाफेक केली तसेच ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आठवलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सहा साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील पंकज इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ६ एस.बी. जोशी यांनी आरोपी बंडू आठवलेला कलम ३५३ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड, कलम ४४८ अन्वये सहा महिने कारावास, १०० रुपये दंड व कलम ४२७ अन्वये एक महिना कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून अरुण हटवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Imprisonment in government work, corporator imprisoned for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.