राज्यात व्याघ्र गणनेसाठी अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 05:56 PM2018-04-17T17:56:34+5:302018-04-17T17:56:34+5:30

देश, राज्यात वाघांची संख्या किती? यासंदर्भातील घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे. नवतंत्रज्ञान प्रणालीने वाघांची प्रगणना करण्यास भरीव मदत मिळत असल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Improved camera traping for tiger counting in the state | राज्यात व्याघ्र गणनेसाठी अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग

राज्यात व्याघ्र गणनेसाठी अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग

Next

 अमरावती - देश, राज्यात वाघांची संख्या किती? यासंदर्भातील घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे. नवतंत्रज्ञान प्रणालीने वाघांची प्रगणना करण्यास भरीव मदत मिळत असल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बुद्धपौर्णिमेच्या रात्री २४ तास वाघांची गणना केली जाणार आहे.

व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, पाणवठ्यावरील अस्तित्व व वनविभागाने विहित केलेल्या पद्धतीने २०१४ ते २०१८ या दरम्यान व्याघ्र गणनेला सुरुवात करण्यात आली. यात नवीन पद्धतीनुसार कॅमेरा ट्रॅपिंग, नवतंत्रज्ञान प्रणाली वापरून देशभरातील वाघांची संख्या किती, ही अचूक आकडेवारी निदर्शनास आली आहे. कॅमेरा ट्रॅपिंगमुळे वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची गणना करणे सोयीचे झाले आहे. एका व्याघ्र प्रकल्पातील वाघ दुसºया सीमेत गेल्यास कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीने ते सिद्ध करता येते. या अद्ययावत प्रणालीने देहरादून वन्यजीव संस्थेला सात वर्षांनी वाघांची संख्या निश्चित करणे सुकर झाले आहे. वाघांच्या पट्ट्यावरून कॅमेरा ट्रॅपिंगमुळे संख्या किती, हे आता सहजतेने स्पष्ट होऊ लागले आहे. परंपरागत पद्धतीने वाघांची प्रगणना करणे यापूर्वी कठीण होते. मात्र, नव्या अद्ययावत कॅमेरा ट्रॅप प्रणालीने वाघांची संख्या ठरविणे सोपे झाले आहे. वनविभागाने हे नवे तंत्रज्ञान शस्त्र म्हणून वापरण्यास प्रारंभ केला आहे. परिणामी राज्यात वाघांची अचूक संख्या कळण्यास मदत झाली आहे. कॅमेरा ट्रॅपिंग प्रणाली ही वाघांचे संरक्षण आणि शिकाºयांवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे वनविभागाने वनखंडानुसार महत्त्वाच्या जागी कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेºयांवर मॉनेटरिंग केले जात आहे. दर दोन ते तीन दिवसांनी तपासणी करून वन्यप्राण्यांच्या टिपलेल्या हालचालींवर लक्ष ठेवणे वनधिकाºयांना सुलभ झाले आहे. ताडोबा- अंधारी, पेंच, बोर, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव बांध - नागझिरा या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांमध्ये कॅमेरा ट्रॅपींग प्रणाली हीे वाघांची संख्या निश्चिती करण्यासाठी दूवा ठरू लागली आहे.

प्रचलित व्याघ्र गणनेला मिळाला फाटा
दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्याची पद्धत आहे. पूर्वी व्याघ्र गणना करायची म्हटले की, पाणवठ्यावर वाघांची विष्ठा, मूत्र, पायाचे ठसे, वाघांनी शिकार केलेल्या घटनास्थळावरील पुरावे अशा प्रचलित पद्धतीवर वाघांची संख्या निश्चित केली जात होती. मात्र, नवीन कॅमेरा ट्रॅप प्रणालीमुळे वाघांची अचूक आकडेवारी नोंदविणे शक्य झाले आहे.

बुद्धपौर्णिमेला २४ तास व्याघ्र गणना
३० एप्रिल रोजी बुद्धपौर्णिमेच्या मध्यरात्रीपासून २४ तास व्याघ्र गणना करण्याचे व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांनी ठरविले आहे. वरिष्ठांच्या निर्देशानुसार व्याघ्र गणनेची तयारी चालविली आहे. अद्ययावत कॅमेरा ट्रॅप प्रणालीचा वापर होत असून, पाणवठ्यावर मचानी, दुर्बिण, कॅमेरे, अधिकारी व कर्मचा-यांच्या फौजफाटा राहणार आहे.

कॅमेरा ट्रॅप प्रणालीने वन्यपशुंची गणना करणे सुकर झाले आहे. यापूर्वी परंपरागत पद्धतीने होणाºया व्याघ्र गणनेत अनेक अडचणी येत होत्या. प्रचंड परिश्रम करूनही वाघांची अचूक आकडेवारी निश्चित करता येत नव्हती. परंतु, कॅमेरा ट्रॅपिंग प्रणाली वाघांच्या प्रगणनेसाठी लाभदायक ठरली आहे.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर

Web Title: Improved camera traping for tiger counting in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.