अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजनासाठी सुधारित आदेश
By admin | Published: April 8, 2017 12:16 AM2017-04-08T00:16:28+5:302017-04-08T00:16:28+5:30
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले तेव्हापासून समायोजित शाळेत रुजू होईपर्यंतचा कालावधी कर्तव्यकालावधी असल्याबाबतची नोंद सेवापुस्तका करण्यात यावी, ....
शेखर भोयर यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र : सेवापुस्तिकेत नोंदीची मागणी
अमरावती : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले तेव्हापासून समायोजित शाळेत रुजू होईपर्यंतचा कालावधी कर्तव्यकालावधी असल्याबाबतची नोंद सेवापुस्तका करण्यात यावी, अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजनासाठी सुधारित आदेश काढण्यात यावा, अशी मागणी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना केली.
सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार राज्यात समायोजनाची प्रक्रिया पार पडली. यावेळी समायोजन आदेशाची तारीख व रुजू करून घेतल्याची तारीख यात बराच कालावधी गेला आहे. या कालावधीत सदर शिक्षकांच्या कुठल्याही शाळेवर स्वाक्षऱ्या नाहीत वा उपस्थितीची नोंद नाही. यामुळे शिक्षकांना भविष्यात याचा त्रास होऊ शकतो. भविष्यात कुठलाही धोका उदभवू नये, यासाठी कार्यमुक्त केल्यापासून समायोजित शाळेत रुजू होईपर्यंतचा कालावधी, कर्तव्य कालावधी असल्याबाबतची नोंद सेवापुस्तकात करावी, अशी मागणी केली आहे. राज्य आयुक्तांनी संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत वेळापत्रक जाहीर केले. परंतु उपरोक्त आदेशात बऱ्याच बाबी शिक्षकांविरुद्ध आहेत. (प्रतिनिधी)