कोरोना दारात, अमरावती जिल्ह्यात ५ नवे रुग्ण आढळले
By उज्वल भालेकर | Published: December 28, 2023 10:11 PM2023-12-28T22:11:31+5:302023-12-28T22:11:44+5:30
अमरावती : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी ५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद ...
अमरावती: जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी ५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे.
प्राप्त माहितीनुसार ५२ संशयित रुग्णांचे सॅम्पल हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील ५ रुग्णांचा अहवाल म्हणजेच दहा टक्के रुग्णांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये अमरावती शहरातील २ रुग्ण असून ३ रुग्ण हे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण आहेत. यातील एक महिला रुग्ण अकोला जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाकडून मिळालेली आहे.