एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या

By प्रदीप भाकरे | Published: July 17, 2023 05:46 PM2023-07-17T17:46:56+5:302023-07-17T17:47:33+5:30

ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट : फरार, वॉटेड आरोपींना केली अटक

In one night, 686 policemen hit the streets, 69 accused | एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या

एका रात्रीतून ६८६ पोलिस उतरले रस्त्यावर, ६९ आरोपींच्या मुसक्या

googlenewsNext

अमरावती : आगामी सण उत्सवादरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासह मालमतेच्या गुन्हयांवर अंकुश लावण्याकरिता ग्रामीण पोलिसांनी १६ जुलै रोजी रात्री १२ ते १७ जुलैच्या पहाटे पाच वाजेपर्यंत ऑपरेशन ऑलआऊट राबविण्यात आले. मोहीमेदरम्यान महत्वाचे रस्त्यांसह राज्याच्या सिमेवर सशस्त्र नाकाबंदी करण्यात आली. मोहिमेदरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह ६८६ अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते.

सराईत गुन्हेगारांच्या तपासणीसह त्यांची आश्रयस्थाने, फरार आरोपी, पकड वॉरंटमधील आरोपी अवैध व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली आहे. फरार घोषित असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली. यातील दोन आरोपी हे दहा व एक आरोपी पाच वर्षांपासून फरार होता. मोहिमे दरम्यान गस्तीवर असतांना अचलपूर, धारणी, परतवाडा, चांदूर रेल्वे व स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींविरूध्द शस्त्र अधिनियमान्वये कार्यवाही केली. तर, परतवाडा, वरूड, सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुन्हा करण्याच्या दृष्टीने संशयितरित्या फिरणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

६९ आरोपी अटक

मोहिमेदरम्यान पकड़ वारंटमधील एकूण ६९ आरोपींना अटक करण्यात आली. ३९ जमानती वारंट व ८४ समन्स बजावणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान १०९ वाहनांवर कार्यवाही करण्यात आली. अवैध दारूविरुद्ध २२ केसेस करून ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अचलपूर व अंजनगांव येथे २४ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. शिरजगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश अनुषंगाने दोन कारवाया करण्यात आल्या. तेथून ५२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हेगारांवर वचक

मोहिमेदरम्यान पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, चार पोलीस उपअधिक्षक, ३१ठाणेदारांसह एकुण ८३ पोलीस अधिकारी व ६०३ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
अचानक रावबिलेल्या या मोहिमेमुळे समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच वचक बसला असून अशा प्रकारच्या मोहीम सतत राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले.

Web Title: In one night, 686 policemen hit the streets, 69 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.