अमरावतीमध्ये सहा महिन्यात ३८ जुळे, तर एकीला तिळे आले जन्माला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 12:38 PM2024-07-15T12:38:30+5:302024-07-15T12:39:31+5:30
Amravati : जिल्हा स्त्री-रुग्णालयात महिलांची यशस्वी प्रसूती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काही स्त्रिया प्रसूतीदरम्यान एकाच वेळी दोन किंवा तीन बाळांना जन्म देतात. एका आकडेवारीनुसार ४० पैकी एक महिला जुळ्या बाळांना जन्म देते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील सहा महिन्यांमध्ये शहरातील जिल्हा स्त्री- रुग्णालय (डफरीन) येथे ३८ मातांनी जुळ्यांना, तर एका मातेने तिळ्यांना जन्म दिला आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक आठ महिलांनी जुळ्यांना जन्म दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
जुळे मूल जन्माला येण्याचे दोन प्रकार आहेत. यामध्ये एक आयडेंटिकल आणि नॉन- आयडेंटिकल. वैद्यकीय भाषेत, त्यांना मोनोझिगोटिक आणि डायझिगोटिक म्हणतात. सहसा, महिलेच्या शरीरात अंडे असते, जे शुक्राणूंच्या साहाय्याने एक गर्भ तयार करते. मात्र, या गर्भात अनेकदा एक नव्हे तर दोन मुले तयार होतात. ही जुळी मुले एकाच अंड्यातून तयार झालेली असतात. त्यामुळे त्यांची नाळदेखील समान असते. या अवस्थेत एक तर दोन मुले जन्माला येतात किंवा दोन मुली. त्यांचे फिंगरप्रिंट्स वेगळे असले तरी ते सामान्यतः दिसायला सारखे असतात.
कोणत्या महिन्यात किती?
महिना जुळे तिळे
जानेवारी ०७ ००
फेब्रुवारी ०४ ००
मार्च ०६ ००
एप्रिल ०८ ००
मे ०७ ००
जून ०६ ०१
जुळे-तिळे जन्माची कारणे
जेव्हा एकाऐवजी अनेक शुक्राणू आणि बीजातून गर्भ तयार होतो तेव्हा तो दोन ठिकाणी विभागला जातो. प्रत्येक गर्भ हा गुणसुत्रांच्या भाषेत जवळपास सारखा आणि अनुवांशिकदृष्ट्या एकसारखा असतो. बहुतेक वेळा या दोन्ही गर्भाचे लिंग सारखेच असते. गर्भाशयात त्यांचे विभाजन केव्हा होते, यावर त्यांच्यातील नंतरचा सारखेपणा अवलंबून असतो. अनेकदा जुळी मुले एकसारखी दिसत नाहीत. त्या गर्भाच अस्तित्व दोन वेगळ्या बीजांतून आणि शुक्राणूंतून तयार झालेले असते. अशा गभर्भातील भ्रूणांचे लिंग सारखे किंवा वेगळे असते. बराच वेळा जुळी ही गर्भधारणेतून केलेल्या उपचारांमुळे गर्भाशयात तयार झालेली असतात.
सहा महिन्यांत ३८ जुळे, एक तिळे
शहरातील जिल्हा स्त्री- रुग्णालय (डफरीन) येथे रोज सरासरी २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. या ठिकाणी मागील सहा महिन्यांमध्ये ३८ मातांनी जुळ्यांना जन्म दिला आहे; तर एका मातेने तिव्ळ्यांना जन्म दिला आहे. या सर्व प्रसूती यशस्वी करण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे.
"जिल्हा स्त्री-रुग्णालयात जिल्हाभरातून गर्भवती महिला प्रसूतीसाठी येतात. रोज सरासरी २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. मागील सहा महिन्यांमध्ये रुग्णालयात ३८ महिलांनी जुळ्ळ्यांना जन्म दिला, तर एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला आहे."
- डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक, डफरीन