श्री शारदीय नवरात्र महोत्सवात भरगच्च कार्यक्रम
By admin | Published: October 2, 2016 12:08 AM2016-10-02T00:08:37+5:302016-10-02T00:08:37+5:30
नवरात्र महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. विदर्भाची संस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीची कुलस्वामिनी अंबा- एकवीरादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
भाविकांची गर्दी वाढणार : सुरक्षेतही वाढ
अमरावती : नवरात्र महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. विदर्भाची संस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीची कुलस्वामिनी अंबा- एकवीरादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. १ ते ११ आॅक्टोबरदरम्यान श्री अंबादेवी संस्थानच्यावतीने विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजता विधीवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रौत्सवात रोज सकाळी ८.३० वाजता संस्थेच्या नवीन कीर्तन हॉल येथे श्री संत अच्युत महाराजांचे परम शिष्य हभप सचिन देव यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ५ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत विविध भजनी भंडळाच्या वतीने भजन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये अंबानगरीतील विविध भजनी मंडळाच्यावतीने हरिपाठसुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. रात्री ७ ते ८ दरम्यान मंत्रजागर, सोमवार १० आॅक्टोबर रोजी नवमीला होमहवन करण्यात येणार असून दशमीला देवी सीमोल्लंघनाला जाणार आहे. या उत्सवादरम्यान ३ आॅक्टोबर रोजी दुपारी १ ते३ वाजेपर्यंत तपोवन येथील बांधवांचा दर्शनाचा कार्यक्रमही पार पडणार आहे, असे संस्थेच्या विश्वस्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)