निर्जीव रस्ते जिवंत झाले; रिक्षा, टांगा धावू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:55+5:302021-05-28T04:10:55+5:30

मेळघाटातील आदिवासी खरेदीसाठी परतवाड्यात : संचारबंदीत थोडा दिलासा परतवाडा : मागील २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कुलूपबंद असलेली दुकाने, ...

Inanimate roads came to life; Rickshaws, legs started running | निर्जीव रस्ते जिवंत झाले; रिक्षा, टांगा धावू लागले

निर्जीव रस्ते जिवंत झाले; रिक्षा, टांगा धावू लागले

Next

मेळघाटातील आदिवासी खरेदीसाठी परतवाड्यात : संचारबंदीत थोडा दिलासा

परतवाडा : मागील २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कुलूपबंद असलेली दुकाने, घरात पडलेली माणसे, त्यामुळे निर्जीव झालेले रस्ते मागील २० दिवसानंतर गुरुवारी परतवाडा-अचलपूर शहरात जिवंत दिसून आले मालवाहू प्रवासी वाहनांसह गावखेड्यात धावणारा टांगा तीन चाकी ऑटोसह रिक्षाही धावला.

परतवाड्यात गुरुवारचा आठवडी बाजार असतो. अमरावती जिल्ह्यात हा सर्वात मोठा बाजार आहे. अचलपूर तालुक्याला लागून असलेला आदिवासीबहुल मेळघाटचा भाग तर सीमारेषेवरील मध्यप्रदेश बैतुल जिल्हा, चांदूरबाजार, अंजनगाव, भातकुली, दर्यापूर तालुके वजा त्यातील गाव खेडे लागून आहेत मुख्य बाजारपेठ असलेल्या परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात ठोक विक्रेते आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान दुकानदार व नागरिक खरेदीसाठी येथे धाव घेतात; परंतु मागील २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून वरुणाचा धसका आणि लागलेले लॉकडाऊन पाहता सर्व व्यवहार थांबले होते. गुरुवारी परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराला जोडणाऱ्या तालुका व ग्रामीण भागातील रस्ते धावताना दिसून आले. मेळघाटातील आदिवासी कपडे, भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक साहित्य सोबतच पावसाळ्याचे दिवस पाहता प्लास्टिक पन्नी खरेदी करताना दिसले.

बॉक्स

रोजगार हिरावला, व्यवहार थांबला

कोरोनाचा कहर दुसरी लाट भयंकर आल्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतणारी ठरली मागील चार दिवसांपासून रुग्णास संख्येत काहीशी घट येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लादलेले कडक निर्बंध शिथिल केले, त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळी ७ ते ११ उघडू लागली आहे. कमी वेळेत लांबचे अंतर आणि सर्व कामे आठवण्यासाठी पहाटेपासूनच ग्रामीण भागातील नागरिक व्यापारी शहरात दाखल होत असून लावलेला रोजगार व थांबलेला व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या प्रयत्नात धावपळ करीत असल्याचे चित्र दिसून आले.

बॉक्स

रिक्षा, टांग्यासह, ऑटोची सवारी

परतवाडा- अचलपूर शहरात आजही नजीकच्या ग्रामीण भागातील नागरिक टांगा, रिक्षा, सोबत ऑटोरिक्षा आदींनी प्रवास करतात, महामंडळाच्या बस गाड्या ग्रामीण भागात अजूनही बंदच आहेत त्यामुळे गुरुवारी शहरात याच वाहनाने नागरिक ये-जा करताना दिसून आले.

Web Title: Inanimate roads came to life; Rickshaws, legs started running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.