नेरपिंगळाई येथील जनता विद्यालयात ग्रंथालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:04 AM2021-08-02T04:04:04+5:302021-08-02T04:04:04+5:30
पान ३ नेरपिंगळाई : आजच्या मोबाईल युगात ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भविष्यात वाचन संस्कृती जिवंत ठेवायची असेल, ...
पान ३
नेरपिंगळाई : आजच्या मोबाईल युगात ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भविष्यात वाचन संस्कृती जिवंत ठेवायची असेल, तर सुसज्ज ग्रंथालय असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. येथील संस्थेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, पद्माकर सोमवंशी, मुख्याध्यापिका सरला अनिल कुचे, चाफले, इठोले, आजीवन सदस्य अमोल बारब्दे, डॉ. प्रमोद झाडे, डॉ. मोहन देशमुख, डी.एच. अर्डक, भैयासाहेब मेटकर, बाळासाहेब गावंडे, सरपंच सविता खोडस्कर, मोर्शी पंचायत समितीच्या उपसभापती सोनाली नवले, संजय मंगळे, डॉ. प्रकाशचंद्र राठी, डॉ. अलका काळे, मेहबूब दौला, डॉ. धनंजय तट्टे, प्रदीप देशमुख, डॉ. प्रकाश कठोर, प्रकाश राऊत, नरेश पाटील, सुहास धोटे उपस्थित होते. संचालन संगीता बढे यांनी केले. आभार प्रदर्शन ए.एम. देशमुख यांनी केले.