मोर्शीत राज्यस्तरीय योग परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 09:28 PM2017-10-14T21:28:44+5:302017-10-14T21:28:59+5:30
बृहन्महाराष्टÑ योग परिषद अमरावती, गुरूकुल बहुउद्देशीय संस्था मोर्शी व योग विभाग मोर्शी व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन मोर्शी येथील साबू मंगल कार्यालयाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : बृहन्महाराष्टÑ योग परिषद अमरावती, गुरूकुल बहुउद्देशीय संस्था मोर्शी व योग विभाग मोर्शी व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन मोर्शी येथील साबू मंगल कार्यालयाच्या लॉनवर करण्यात आले.
१३ ते १५ रोजी होणाºया योग स्पर्धेसाठी देशभºयातून योगपटू मोर्शीत दाखल झाले आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आमदार अनिल बोंडे, स्वामी जितेंद्रनाथ महाराज, प्रकाश बोके, वसुधा बोंडे, सुमंगला श्रीराव, क्षीरसागर, सोनारे, नगरसेविका प्रीती देशमुख, छाया ढोले, सीमा म्हाला, जगदीश जैस्वाल, नितीन राऊत, हर्षल चौधरी, मनोहर शेंडे, शेषराव खोडस्कर, सुनील ढोले, सुधाकर जोशी, नामदेवराव सातपुते, विठ्ठलराव वानखडे उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरावर प्रतिनिधीत्व करणारे योगपटू प्रगती वानखडे, पूजा जावरे, अमोल दारोकर, सुनील पवार, अतुल वैद्य, वरूडचे योगपटू सोनारे तसेच जगदीश जैस्वाल यांचा सत्कार करण्यात आला.
चार हजार लोकांना योगासनाचे धडे शिकवीत त्याने तसेच प्रगती वानखडे, बृहन्महाराष्टÑ योग परिषद अमरावतीचे योगपटू, राष्टÑीय योगपटू सुधाकर जोशी, नामदेवराव सातपुते, विठ्ठलराव वानखडे यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. जितेंद्रनाथ महाराज यांनी भारताला सर्वात जास्त तरूण वर्ग असून १७८ देशांनी भारताला योगाचा गुरू मानला आहे, असे मनोगत व्यक्त केले. अनिल बोंडे यांनी योगाची ख्याती जगभर पसरली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निखिल ओझा, संचालन देवेंद्र ठाकरे यांनी, तर आभार अतुल वैद्य यांनी मानले. परिषदेत योगाच्या प्रचार-प्रसारावर मंथन करण्यात येणार आहे.