‘लोकमत’मध्ये सोलर पॅनेल युनिटचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:01+5:302021-07-03T04:10:01+5:30
अमरावती: वीजेबाबत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत शुक्रवारी ‘लोकमत’ च्या अमरावती विभागीय कार्यालयामध्ये सोलर पॅनेल युनिटचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा शल्य ...
अमरावती: वीजेबाबत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत शुक्रवारी ‘लोकमत’ च्या अमरावती विभागीय कार्यालयामध्ये सोलर पॅनेल युनिटचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी कळ दाबून या सोलर युनिटचा शुभारंभ केला. ‘लोकमत’ कार्यालयाच्या छतावर हे सोलर युनिट उभारण्यात आले. सौरउर्जेवर आधारित प्रकल्पाच्या कार्यान्वयनाने कार्यालय झळाळून निघाले.
या कार्यक्रमाला यावेळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे, विक्रम टी प्रोसेसरचे जिल्हा व्यवस्थापक प्रसाद पांढरीकर, ‘लोकमत’च्या अमरावती युनिटचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गजानन चोपडे, हॅलो हेड गणेश वासनिक, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सुनील चौरसिया उपस्थित होते.
सूर्य नैसगिकरित्या उर्जानिर्मिती करतो. सूर्यप्रकाशाचा सौरउर्जा म्हणून वापर केल्यास टाकाऊ घटक पुन्हा निसर्गात परत जाणार नाहीत, राज्यसरकारने देखील २०२५ पर्यंत सौरउर्जेवर २७ हजार मेगावॅटची वीजनिमिती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने ‘लोकमत’ने केलेली सुरूवात स्तुत्य असल्याची भावना महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे व इपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.