राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:08 PM2018-11-30T23:08:50+5:302018-11-30T23:09:16+5:30

रुक्मिणीनगरातील नेताजी सामाजिक विकास संस्था व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेला शुक्रवारी थाटात प्रारंभ झाला. स्पर्धा ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होत असून, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन महापौर संजय नरवणे यांनी केले.

Inauguration of state-level kabaddi competition | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देनेताजी मंडळाचे आयोजन : दिमाखदार सोहळा, गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रुक्मिणीनगरातील नेताजी सामाजिक विकास संस्था व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेला शुक्रवारी थाटात प्रारंभ झाला.
स्पर्धा ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होत असून, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन महापौर संजय नरवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू गणेश पाटील, महापालिका आयुक्त संजय निपाणे, स्थायी समिती सभापती विवेक कलोती, तेलंगणा येथील कृषी उद्योजक सुहासिनी शेट्टी, डॉ. बी.आर. देशमुख, शासकीय अभियोक्ता विवेक काळे, अरुण डबरे, कल्पना देशमुख, पप्पू पडोळे, संजय गुडधे आदींची उपस्थिती होती. मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख, संचालन मोनिका उमक व आभार प्रदर्शन प्रफुल्ल देशमुख यांनी केले.
उद्घाटनाचा सामना पुरुष गटात यंग स्टार क्लब (अकोला) व संभाजी क्रीडा मंडळ (वाशिम) यांच्यात रंगला. महिला गटातील पहिला सामना आर.के. स्पोटर््स क्लब (पुलगाव) व धाबेकर महाविद्यालय (कारंजा लाड) यांच्यात रंगला. वृत्त लिहिस्तोवर निकाल हाती आले नव्हते. हा दिमखदार सोहळा व कबड्डी सामने पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती. कबड्डीप्रेमींसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मंडळाचे सचिव सतीश काळे, बबनराव सोलीव, विलास म्हाला, मारुती लोहांडे, राजू मक्रमपुरे, दिलीप राऊत, संजय येऊतकर, संजय वानखडे, मुकेश गिरी, मुन्ना काळेल संजय देशमुख, दिनेश धुमाळे, अविनाश वाकोडे, राजेश राऊत, नितीन इसोकार, राजेश गाजरे, रवि इंगळे, नीलेश राऊत, शैलेश राऊत, संतोष शेळके, दीपक शेळके, नितीन वैद्य, बाबासाहेब देशमुख, उमेश धुमाळे, पमोद मेटे, श्याम देशमुख आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Inauguration of state-level kabaddi competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.