विदेशी पाहुण्यांनी रोजगारासाठी महिलांना दिले प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:03 PM2018-04-07T22:03:16+5:302018-04-07T22:03:16+5:30
आमदार यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘घे भरारी’ या व्यासपीठ अंतर्गत महिलांसाठी उभा केलेला उपक्रम स्पेन येथील प्रतिनिधींनी पाहिला आणि बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : आमदार यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘घे भरारी’ या व्यासपीठ अंतर्गत महिलांसाठी उभा केलेला उपक्रम स्पेन येथील प्रतिनिधींनी पाहिला आणि बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले.
‘घे भरारी’च्या तालुक्यातील तळेगाव ठाकूर, शिरजगाव मोझरी, तिवसा केंद्रांना स्पेन येथील विदेशी विद्यार्थी प्रतिनिधी एनरिस, लिबे, ओआयनीसह स्नेहल वानखडे यांनी भेट दिली. महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या, वस्त्र आदी उत्पादनांना बाजारपेठ, आर्थिक साहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करण्यासह गावातील महिलांशी व मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्यांबाबत त्यांनी चर्चा केली. या केंद्रांत ग्रामीण भागातील मुलींना शिलाई मशीन व शिवणकामाबाबत शिक्षित केले जाते. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना व मुलींना विनामूल्य शिक्षण दिले जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारप्रणाली, मार्गदर्शन, साहित्याने त्या प्रभावित झाल्या.