राज्य दुष्काळमुक्त अभियानात तीन हजार गावांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:19 AM2018-04-23T01:19:47+5:302018-04-23T01:19:47+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ पासून या कामांची सुरुवात करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याची माहिती रविवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये भारतीय जैैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी दिली.
अमरावती : संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ पासून या कामांची सुरुवात करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याची माहिती रविवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये भारतीय जैैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी दिली.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियान २०१८ चे जिल्हा समन्वयक प्रदीप जैन, ऋषभ बरडिया, विलास उदापूरकर, सुनील जैन, धर्मेंद्र जैन आदी पत्रपरिषदेला प्रामुख्याने उपस्थित होते. अभियानाच लोकांचाही चांगला सहभाग मिळत असून, ज्या गावात पाण्याची टंचाई आहे, तेथे भविष्यात पाणी अडवून जिरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेसीबी व पोकलॅन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून ४०० गावांमध्ये कामे करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावांत कामे करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्याच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांत पाच हजार ग्रामपंचायतींमधून आलेल्या प्रत्येकी यामध्ये दोन महिला व तीन पुरुषांनी पानी फाऊंडेशनद्वारा स्थापित प्रशिक्षण केंद्रात सतत चार दिवसांचे जलसंवर्धन प्रशिक्षण प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अभियान सुरू आहे.