अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसुली

By admin | Published: August 19, 2015 12:46 AM2015-08-19T00:46:23+5:302015-08-19T00:46:23+5:30

थोड्याफार लाभासाठी पोलिसांचे या गँगला छुप्या मार्गाने अभय मिळत गेल्याने त्यांचे धाडस वाढत गेले. ....

Income recovery from illegal businessmen | अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसुली

अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसुली

Next

अमरावती/अचलपूर :थोड्याफार लाभासाठी पोलिसांचे या गँगला छुप्या मार्गाने अभय मिळत गेल्याने त्यांचे धाडस वाढत गेले. यातील सदस्यांसोबत शहरात दहशत पसरवणाऱ्या कारवाया वाढत गेल्या. या गँगचे सदस्य सट्टा, मटका चालक, अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसूल करीत असल्याची चर्चा आता चौकाचौकांत जोर धरू लागली आहे.
पोलिसांचेही नसे भय
दीड वर्षांपूर्वी सरमसपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या घटनेने गांधी पुलावर दोन समुदायात तणाव निर्माण झाला होता. एका युवकाने बाहेरगावी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेड काढली होती. हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले. त्यावेळी तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अचलपुरात आले होते. सदर युवकाला तत्कालीन पीएसआय मोहन बोरसे यांनी मारहाण केल्याचा आरोप बारूद गँगच्या म्होरक्यांनी करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. याचाच अर्थ छेडखानी करणाऱ्या युवकांना बारूद गँगचे संरक्षण मिळत असे.
दरम्यान एका विद्यार्थिनीच्या भ्रमणध्वनीवर एका युवकाने फोन करून अश्लील संभाषण केल्याने चावलमंडी भागात डॉ. कानगोच्या दवाखान्याजवळ रात्री ८ च्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. पण तेथे पीएसआय पद्मशिला तिरपुडे, सुदर्शन झोड, पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ पोहोचल्याने हे प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात आले होते. यातही बारूद गँगचे सदस्य सहभागी होते. (प्रतिनिधी)
महसूल अधिकाऱ्यांचाही सहभाग
कमी श्रमात भरपूर मोबदला मिळविण्याच्या हेतूने दोन वर्षांपासून बारूद गँगच्या सदस्यांनी महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी संधान साधून रेतीची खुलेआम तस्करी सुरू केली होती. यात काही पोलीस अधिकारीही सहभागी होते. रेती तस्करीतून थोड्याच कालावधीत ते चांगलेच गब्बर झाल्याने त्यातील काहींनी शहरात दहशत पसरवण्याकडे लक्ष केंद्रित केले व त्यातूनच अमित बटाउवाले यांचा खून त्यांनी भरदिवसा केला. बारूद गँगला रेती तस्करीसाठी कोणत्या महसूल अधिकाऱ्याचे पाठबळ होते, याची कसून चौकशी झाल्यास तथ्य उघड होईल. बारुद गँगच्या गुन्हेगारी कारवायांचा सफाया करण्यासाठी जुळ्या नगरीतील तमाम शांतताप्रिय नागरिक एकवटले आहेत. प्रशासन आणि शासनाने लोकभावनेचा आदर करण्याची ही वेळ आहे.

Web Title: Income recovery from illegal businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.