आयकर विभाग म्हणाला, ‘त्यांची’ भूमिका अहकार्याची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:05+5:302021-08-17T04:19:05+5:30

याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी से दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने आयकर विभागाला दिले होते. त्यानुसार, आयकर विभागाकडून नागपूरचे ॲड. ...

The income tax department said, 'their' role is arrogance! | आयकर विभाग म्हणाला, ‘त्यांची’ भूमिका अहकार्याची!

आयकर विभाग म्हणाला, ‘त्यांची’ भूमिका अहकार्याची!

Next

याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी से दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने आयकर विभागाला दिले होते. त्यानुसार, आयकर विभागाकडून नागपूरचे ॲड. अमोल जलतारे यांनी सोमवार १६ ऑगस्ट रोजी जेएमएफसी क्रमांक ५ मध्ये बाजु मांडली. पोलिसांनी ताब्यात घेतलेली ती रक्कम आपली असल्याचा दावा अहमदाबाद येथील निना शहा यांनी राजापेठ पोलिसांसह न्यायालयात केला होता. मात्र, त्यासंबंधाने निना शहा व अन्य संबंधितांना हजर राहण्याबाबत आयकर विभगाने समन्स बजावले होते. मात्र कुणीही हजर राहिले नाही. कुठलाहूी दस्तावेज सादर केला नाही. त्यामुळे चौकशी पुर्णत्वास गेलेली नाही. रक्कम आपली असल्याचा दावा करणारे लोक आयकर विभागाला सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे त्यांनी आयकर विभागाच्या नागपूरस्थित सहसंचालक युनिट २ समोर कागदपत्रांसह उपस्थित व्हावे, असा आदेश न्यायालयाने काढावा, असा विनंती अर्ज ॲड. जलतारे यांनी सोमवारी न्यायालयात सादर केला.

कोट

३.५० कोटी रकमेशी संबंधित लोक चौकशीला सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावे आयकर विभागासमोर हजर राहण्याचा आदेश काढावा, असा अर्ज सोमवारी अमरावती न्यायालयात सादर केला. तपसाअंती ‘से’ दाखल करू.

अमोल जलतारे,

वकील, आयकर विभाग

Web Title: The income tax department said, 'their' role is arrogance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.