कंत्राटी सुरक्षा रक्षकाचे पत्नीसह बेमुदत उपोषण
By admin | Published: April 20, 2017 12:14 AM2017-04-20T00:14:38+5:302017-04-20T00:14:38+5:30
कंत्राटी पद्धतीवर दहा वर्षे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला विज वितरण कंपनीने डावलून दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती केली.
सेवेतून कमी केल्याचे प्रकरण : जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा प्रताप
अमरावती : कंत्राटी पद्धतीवर दहा वर्षे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला विज वितरण कंपनीने डावलून दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती केली. कंपनीने केलेली ही नियुक्ती नियमबाह्य आहे. दहा वर्षे काम केल्यामुळे त्या जागी आपणास कायम करावे अशी मागणी करीत स्थानिक सहायक कामगार कल्याण आयुक्त कार्यालयानजीक आदोलनाला राजेश सतीश धुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपोषणावर बसले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे येथील विज वितरण कंपनीच्या ३३ केव्हीच्या उपकेंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून २००६ ते २०१६ या कालावधीत काम केले. दरम्यान १ फेब्रुवारी २०१७ पासून त्याला कं पंनीने कामावरून कमी केले व त्या जागी दुसऱ्याची नियुक्ती केली. अचानक कंपनीतून काढल्याने राजेश व त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून राजेश धुळे हे येथील उपकेंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी पध्दतीने २००६ ते २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत कार्यरत होते. या पदावर कार्यरत असतांनाच १ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा सुरक्षा मंडळाची अमरावती यांनी सुरक्षा रक्षक या पदावर मौजे तिवडी फाटा ३३ के.व्ही. उपकेंद्र उमरखेड येथे कायमस्वरुपी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले. मंडळाच्या आदेशानुसार राजेश यांनी १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ पर्यंत सदर उपकेंद्रावर काम सुध्दा केले. कुठलीही चुक नसतांना कामावरुन कमी करून त्याऐवजी कंत्राटी सुरक्षा रक्षक एजन्सी मार्फत कार्यरत असलेले गणेश दिंगाबर दोडके यांची नियुक्ती केली आहे.
या प्र्रकरणाची चौकशी करून कामावर घ्यावे अशी मागणी राजेशने केली आहे.
गणेश दोडके यांची नियुक्ती नियमबाह्य
ज्या गणेश दिंगाबर दोडके या कंत्राटी सुरक्षा रक्षकाला राजेश धुळे यांना कामावऋन कमी करून त्यांच्य जागेवरनियुक्ती देण्यात आली असून ते नियमबाह्य असून यापुर्वी तो मंडळाच्या कुठल्याही सेवेत नव्हता. यासंदर्भात काही आर्थिक गैरप्रकार झाला असून याप्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करावी, व मला न्याय द्यावा अशी मागणी राजेश धुळे या उपोषकर्त्यांनी केली आहे. माझी कुठलीही चुक नसतांना मला अचानक कामावरुन कमी करण्यात आल्यामुळे माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्याचेही त्याने निवेदनातून सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सदर कामगाराला पूर्वी कंत्राटदारानेही कमी केले होते. त्या दरम्यान त्याच्याजागी दुसऱ्या कामगाराला त्याच्या जागी रूजू केले. त्याने मंडळाकडे नोंदणीके ल्याचे कागतपत्रे सादर केले नाही व हजरही राहला नाही. २२त्याला रिलिव्हर म्हणून सेवेत घेण्यास मंडळ तयार आहे.
- डि.व्ही. बाकडे, प्रभारी निरीक्षक, जिल्हा सुरक्षा मंडळ अमरावती.