नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याच्या वेळेत वाढ
By Admin | Published: April 2, 2015 12:23 AM2015-04-02T00:23:27+5:302015-04-02T00:23:27+5:30
ग्राम पंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी बुधवार १ ते मंगळवार ७ एप्रिल या सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्रे ..
आयुक्तांचा निर्णय : ग्रामपंचायत उमेदवारांना दिलासा
अमरावती : ग्राम पंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी बुधवार १ ते मंगळवार ७ एप्रिल या सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाची निवडणूक अधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांना तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिले आहेत. .
निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशन पत्रे संबंधित ठिकाणी स्वीकारण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची संख्या मोठी असल्यामुळे २६ मार्चच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या सुधारणेनुसार, नामनिर्देशनपत्र स्वीकारताना जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास हमीपत्रासह नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहे.
त्यामुळे नामनिर्देशनपत्रे भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे .