दिव्यांगांच्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:49+5:302021-06-30T04:09:49+5:30
अमरावती : गतवर्षापासून अमरावती शहरात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. दिव्यांगांना त्याची मोठी झळ बसली. दिव्यांगांना आर्थिक मदतीची या काळात खरी ...
अमरावती : गतवर्षापासून अमरावती शहरात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. दिव्यांगांना त्याची मोठी झळ बसली. दिव्यांगांना आर्थिक मदतीची या काळात खरी गरज असल्याने त्यांना मदत करण्याच्या हेतूने महापालिकेने पुढाकार घ्यावा, यासाठी महापौर चेतन गावंडे यांनी नियोजन सुरू केले आहे. दिव्यांगांना वार्षिक पेंशन सहा हजार रुपये देण्यात येत असून, दिव्यांगांकडून वारंवार होत असलेल्या मागणीमुळे सदर वार्षिक आर्थिक मदत रक्कम वाढवून नऊ हजार रुपये करण्याबाबत महापौर चेतन गावंडे यांनी निर्देशित केले आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव आमसभेत सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. समाजातील या घटकाला मदत होण्यासाठी महापौर चेतन गावंडे यांनी पुढाकार घेतला असून, लवकरच याविषयी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या घटकाला न्याय देण्यात येणार आहे. मतिमंद, कुष्ठरोगी, दिव्यांग यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.