सर्दी, खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:29 AM2017-11-28T00:29:12+5:302017-11-28T00:29:38+5:30

रात्रीचा किमान पारा कमी घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वातावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे.

Increase in colds, cough patients | सर्दी, खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ

सर्दी, खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ

Next
ठळक मुद्देविषाणूजन्य ताप : खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल!

आॅनलाईन लोकमत
अमरावती : रात्रीचा किमान पारा कमी घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वातावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे.
येथील इर्विन रूग्णालय, विदर्भ संदर्भ सेवा रूग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या शासकीय रूग्णालयांसह शहरातील शेकडो दवाखाने व क्लिनिकमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे ताप दोन दिवस राहत असेल तर आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
अशा वातावरणात डासांची उत्पत्तीदेखील वेगाने होत असल्याचे कीटकतज्ज्ञांचे मत आहे. मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारातही वाढ झाली असून अमरावती येथील एका खासगी डॉक्टरांकडे डेंग्यू या आजाराचे चार रूग्ण आढळले असून ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा व कोठोडा येथील असल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला सर्तक राहणे गरजेचे आहे.
तापामध्ये जर दूषित पाणी पिण्यात आल्याने टायफाईड, अतिसार यासारख्या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे योग्यवेळी शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळा हा इतर ऋतीच्या तुलनेत सर्व जीवसृष्टीला पोषक मानला जातो. मात्र, अचानक वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, थंडीची तीव्रता वाढल्याने वृध्दांना सांधेदुखी, वात, दम्याच्या आराजाने डोके वर काढले आहे. मणक्यांचा त्रास या दिवसाचा वाढत असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ भूषण सगणे यांनी सांगितले. ताप, खोकला व सर्दीचे रूग्ण वाढत असून जिल्हा रूग्णालयाची रोज १०० ते १५० बाह्यरुग्ण तपासणी होत आहे. खोकला, ताप, सर्दी या आजारांचे रूग्ण उपचारासाठी येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. मात्र, कुठलीही साथ नसल्याचे यावेळी ते म्हणाले.
काय आहे व्हायरल इनफेक्शन ?
व्हायरल इन्फेक्शन हा सर्वांमध्ये कॉमन आढळणारा आजार आहे. अनेक प्रकारच्या विषाणूंपासून होणारे आजार म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तो मानवाच्या शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकते. विषाणूजन्य आजारामध्ये ताप येते. व तो कमी जास्त प्रमाणात चढउतार राहु शकतो. लहान मुलांमध्ये या आजाराची लागण लवकर होत असल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केली आहे.

विषाणूजन्य आजाराची तशी साथ नाही. पण वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

Web Title: Increase in colds, cough patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.