चार प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:48+5:30
सिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बुजवून टाकण्याचा प्रकार थांबला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर मतदारसंघात कोट्यवधीचे सिंचन प्रकल्प कार्यान्वित झाले असून, यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. सिंचनाकरिता आवश्यक कालव्यांची अपूर्ण कामे अस्तरीकरणासह बºयाच प्रमाणात केल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला.
३०२.१४ कोटींचा करजगाव प्रकल्प, ५१५ कोटींचा बोर्डी प्रकल्प, ११०.३६ कोटींचा भगाडी प्रकल्प, ७५१.६७ कोटींचा वासनी प्रकल्प, ५० कोटींचा बेलोरा-गणोजा प्रकल्प आणि १९३.८१ कोटींच्या राजुरा प्रकल्पाकरिता विशेष प्रयत्न केल्याचे आ. कडू म्हणाले. चंद्रभागा, पूर्णा, चारघड, सपन प्रकल्पांच्या सिंचनक्षेत्रात वाढ झाली. चंद्रभागा प्रकल्पांतर्गंत ६१४७ हेक्टर, पूर्णा प्रकल्पांतर्गत ५४१७ हेक्टर, तर चारघड प्रकल्पांतर्गत १४५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार योजनेतून मतदारसंघात नाला जोड प्रकल्प, नाला-नदी खोलीकरण, कालवा दुरुस्ती, नदी पुनरुज्जीवन, ई-क्लास जमिनीवर गावतलाव, शेततळे, खोदतळे, गॅबीयन बंधारे, सिमेंट बंधारे, डोहाच्या खोलीकरणासह अन्य कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
पाइप लाइनद्वारे सिंचन
सिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बुजवून टाकण्याचा प्रकार थांबला. शेवटच्या शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचले. संत्रा बागायतदारांना संत्रा झाडाला ताण देणे शक्य झाले. पाटचारी फुटून पाण्यामुळे खराब होण्यापासून शेती वाचली. पाण्याची काटकसर आणि पिकाला लागणारे नेमके पाणी वापरता आले. पाण्याचा नाश टळला असून, प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. पाणी चोरीला जाण्याचा प्रकारही थांबला आहे. पाइप लाइनद्वारे सिंचन करणे अनेक प्रकल्पांवर प्रस्तावित असून, चंद्रभागा प्रकल्पानंतर सर्वच प्रकल्पांवर त्याला मान्यता मिळाल्याचा दावा आ. बच्चू कडू यांनी केला.